पणदुर तिठ्ठा येथे वेळेवर एसटीसाठी विद्यार्थांचे आंदोलन

कृष्णकांत साळगांवकर
मंगळवार, 30 जानेवारी 2018

ग्रामीण भागात प्रवासाचे साधन म्हणजे महामंडळाची लाल डब्याची एसटी. पण ही कधीही वेळेवर येत नाही. यामुळे शाळा-महाविद्यालयाला जाण्यास विद्यार्थांना उशीर होतो. या समस्येवर लक्ष वेधून घेण्यासाठी विद्यार्थांनी चक्क आज पणदूर तिठ्ठा येथे एसटी अडवली.

सावंतवाडी - शाळा-महाविद्यालय गाठण्यासाठी सकाळी लवकर उठायचे. वेळेवर बसथांब्यावर पोहोचायचे. पण एसटीचा पत्ताच नसोत. ग्रामीण भागात प्रवासाचे साधन म्हणजे महामंडळाची लाल डब्याची एसटी. पण ही कधीही वेळेवर येत नाही. यामुळे शाळा-महाविद्यालयाला जाण्यास विद्यार्थांना उशीर होतो. या समस्येवर लक्ष वेधून घेण्यासाठी विद्यार्थांनी चक्क आज पणदूर तिठ्ठा येथे एसटी अडवली.

(व्हिडिआे - कृष्णकांत साळगांवकर)

वेळेवर एसटी येत नसल्याने शाळा-महाविद्यालयाला जाण्यास उशीर होते. तास बुडतात. शाळा सुटल्यानंतरही एसटी वेळेवर नसते. महामंडळाचा हा गलथान कारभाराचा फटका विद्यार्थांना बसत आहे. वारंवार तक्रार करूनही याकडे महामंडळ दुर्लक्ष करत आहे. एसटी प्रशासनाने या समस्येकडे लक्ष वेधून घेण्यासाठी सावंतवाडी व्हाया ओरोस जाणारी बस विद्यार्थ्यांनी आज अडवली. आता तरी यातून प्रशासन जागे होईल अशी आशा या विद्यार्थांना आहे. 

Web Title: Sindhudurg News Students agitation on Pandur Titha