वैभववाडीत शाॅर्टसर्किटने लागलेल्या आगीत सुमारे 30 एकरावरील ऊस खाक

कृष्णकांत साळगांवकर
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

वैभववाडी - तालुक्यातील कासार्डे, कोकिसरे नारकरवाडी येथे शॉर्ट सर्किटमूळे  उसाच्या शेताला आग लागली. यात कासार्डे येथे अठरा एकरावरील तर कोकिसरे नारकरवाडी येथील 14 एकरावरील ऊस आगीत जळाला. 

वैभववाडी - तालुक्यातील कासार्डे, कोकिसरे नारकरवाडी येथे शॉर्ट सर्किटमूळे  उसाच्या शेताला आग लागली. यात कासार्डे येथे अठरा एकरावरील तर कोकिसरे नारकरवाडी येथील 14 एकरावरील ऊस आगीत जळाला.

कासार्डे येथे झालेल्या घटनेत शेतीला पाणी पुरवठा करणारी प्लास्टिकची पाईपलाईन सुद्धा जळून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा या स्थितीतच ऊस कापावा लागतो आहे  जळलेल्या ऊसाला दरही कमी मिळतो व वजनातही घट होते. त्यामुळे आता या शेतीतून उत्पन्न किती मिळणार याचीच चिंता या शेतकऱ्यांना लागून राहीली आहे. कासर्डे गावातील चार शेतकरी एकत्र आले. त्यांनी ऊस शेती पिकविण्याचे ठरविले यासाठी  आठ लाखाचे कर्जही त्यांनी काढले आहे. हे नुकसान होऊन चार दिवस झाले तरी प्रशासनाचा कोणताही अधिकारी पाहणीसाठी येथे पोहोचला नाही.  तलाठी आणि कृषि अधिकारी यांनी सुद्धा भेटी दिल्या नाहीत. साधा पंचनामाही झाला नाही. या घटनेत शासनाची मदत मिळावी अशी येथील शेतकऱ्यांची मागणी आहे 

कोकिसरे नारकरवाडी येथील घटनेत अवधुत शंकर नारकर व संतोष सावळाराम कोकाटे यांचा १४ एकरवरील ऊस जळाला. आगीत पाईपलाईन देखील भस्मसात झाली. या दोन शेतकऱ्यांचे सुमारे साडेसहा लाखांचे नुकसान झाले आहे. ही आग गुरूवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास लागली. कडक उन्हामुळे आगीने रौद्र रूप धारण केले. अवघ्या काही मिनिटात संपुर्ण ऊसशेती जळुन खाक झाली.

आग लागल्याचे समजताच विज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता एस. बी. लोथे, तलाठी, कृषी सहाय्यक विवेकानंद नाईक यांनी घटनास्थळी जावुन पंचनामा केला. आगीत सुमारे साडेसहा लाखांचे नुकसान झाले आहे. या आठवड्यातील वणवा लागण्याचा हा दुसरा प्रकार आहे.

Web Title: Sindhudurg News Sugarcane burn incidence in Vaibhavwadi