पिंगुळीत तरुणाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 मार्च 2018

कुडाळ - पिंगुळी- चिंदरकरवाडी येथील चेतन धुरी (वय २८) याने आपल्या घरी विषप्राशन करून आत्महत्या केली. तो खरेदी-विक्री संघात कामाला होता. तो गेले आठ दिवस कामावर गेला नव्हता. आज सकाळी तो घरी गच्चीवर असणाऱ्या खोलीत झोपण्यासाठी गेला.

सकाळी उठला नाही. त्याला पाहण्यासाठी घरातील व आजूबाजूची माणसे गेली. दरवाजा बंद असल्याने कौले काढून आत प्रवेश केला. त्या वेळी त्याने विषप्राशन केले होते. त्याला तत्काळ कुडाळ ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथून ओरोस येथे हलविण्यात आले. त्याचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्याने विषप्राशन केलेली बाटली घरात सापडली. शांत आणि मनमिळावू चेतनने आत्महत्या का करावी, हा सर्वांना पडलेला प्रश्‍न होता. 

Web Title: Sindhudurg News suicide incidence in Pinguli

टॅग्स