सावंतवाडी पालिकेत सुकी, बांदेकर यांना सभापतिपदी संधी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 जानेवारी 2018

सावंतवाडी - येथील पालिकेच्या विषय समिती सभापतीची निवड झाली. यात आरोग्य सभापती म्हणून पुन्हा एकदा आनंद नेवगी यांना संधी दिली. शुभांगी सुकी आणि सुरेंद्र बांदेकर यांच्या रूपाने दोन नव्या चेहऱ्यांना सभापतीपद देण्यात आले आहे.

सावंतवाडी - येथील पालिकेच्या विषय समिती सभापतीची निवड झाली. यात आरोग्य सभापती म्हणून पुन्हा एकदा आनंद नेवगी यांना संधी दिली. शुभांगी सुकी आणि सुरेंद्र बांदेकर यांच्या रूपाने दोन नव्या चेहऱ्यांना सभापतीपद देण्यात आले आहे. ही निवड प्रक्रिया बिनविरोध झाली. त्यात नियोजन समिती सभापतिपद हे पदसिद्ध असल्यामुळे उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांच्याकडे राहिले आहे. याबाबतची अधिकृत घोषणा सायंकाळी केली.

येथील पालिकेच्या विषय समितीच्या सभापतिपदाची निवड प्रक्रिया आज होणार होती. यात कोणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता होती. झालेल्या निवडणूक प्रक्रियेत ठरविलेल्या नगरसेवकांनी अर्ज सादर केले होते. त्यानुसार ही प्रक्रिया बिनविरोध पार पडली. यात नगरसेवक बाबू कुडतरकर सभापती असलेल्या पाणी पुरवठा उद्यान व पर्यटन समिती सभापतिपदी 
सुरेंद्र बांदेकर आणि आनारोजीन लोबो या सभापती असलेल्या महिला व बालकल्याण सभापतीपदी शुभांगी सुकी यांची निवड झाली. तर आरोग्य, क्रीडा व जेष्ठ नागरिक कल्याण सभापतीपदी नेवगी यांची पुन्हा निवड केली. नियोजन, जलनिःसारण व पर्यावरण समिती सभापती उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर आणि स्थायी समिती सभापती म्हणून नगराध्यक्ष बबन साळगावकर आहेत.

विरोधी गटाच्या नगरसेवकांना प्रत्येक समितीत दोन सदस्यपदे देण्यात आली आहेत. यात पाणी पुरवठा समिती सदस्य म्हणून आनारोजीन लोबो, मनोज नाईक, सुधीर आडीवरेकर, राजू बेग, आरोग्य समितीवर खेमराज कुडतरकर, भारती मोरे, समृध्दी विर्नोडकर, परिमल नाईक, महीला बालकल्याण समितीपदी दिपाली सावंत, आनारोजीन लोबो, उत्कर्षा सासोलकर, दिपाली भालेकर, नियोजन समिती सदस्यपदी मनोज नाईक, नासीर शेख, उदय नाईक आदींचा समावेश आहे.

Web Title: Sindhudurg News Suki, Bandekar selected as Sabhapati