बघा .....विठ्ठल माझ्याशी बोलला 

अमोल टेंबकर 
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

सावंतवाडी - सुंदरवाडी महोत्सवात बघा, माझ्याशी विठ्ठल बोलला...असे म्हणून माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी चक्क विठ्ठलाशी संवाद साधला. यावेळी उपस्थिातांमध्ये हास्याची लकेर उमटली. 

सावंतवाडी - सुंदरवाडी महोत्सवात बघा, माझ्याशी विठ्ठल बोलला...असे म्हणून माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी चक्क विठ्ठलाशी संवाद साधला. यावेळी उपस्थिातांमध्ये हास्याची लकेर उमटली. 

माजी मुख्यमंत्री नारायण राणे कलाकार आणि त्यांची कला याबाबत नेहमी सकारात्मक असतात. याचा प्रत्यय सुंदरवाडी महोत्सवात अनेकांना पाहायला मिळाला. महोत्सवामध्ये तब्बल साडे चार तासाहून अधिक वेळ व्यासपीठाशेजारी विठ्ठलरुपात स्टॅच्यूू होऊन थांबलेल्या कलाकारांच्या आग्रहास्तव श्री. राणे त्या ठिकाणी गेले. कमरेवर हात ठेऊन विठ्ठल झालेल्या त्या कलाकारांची त्यांनी चौकशी केली. तिरोडा येथील रामचंद्र गव्हाणकर विठ्ठल रूपात, तर योगराज गव्हाणकर तुकाराम महाराजांच्या रूपात आणि सदानंद गव्हाणकर हे गोरा कुंभार रुपात या महोत्सवामध्ये सहभागी झाले आहेत. या कलाकारांची श्री. राणे यांनी भेट घेतली. यावेळी तुम्ही कुठचे असा प्रश्‍न राणेंनी विठ्ठल झालेल्या रामचद्र यांना केला. यावेळी त्यांनी उत्तरे दिली. यावर राणेंनी तात्काळ बघा माझ्याशी विठ्ठल बोलला असे सागुन कोटी केली.  महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा झेंडा अंगावर लपेटलेल्या दिपेश शिंदे या कलाकारांचीही यावेळी  त्यांनी स्तूतीही केली. तसेच पुढील वाटचालीस त्याला शुभेच्छा दिल्या.

राणेंनी मंत्री असताना आणि आता सुध्दा कलाकारांना राजाश्रय देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच प्रत्येकाचा सन्मान केला आहे. तसेच त्यांच्या शब्दासाठी आपण पहीला राजकीय कार्यक्रम केला. त्याच्या आवाजात ताकद आहे. 

- वैशाली सामंत, गायिका

सुंदरवाडी महोत्सवाच्या समारोपासाठी माजी मुख्यमंत्री श्री राणे हे उपस्थित राहीले होते. भाषणात राणेंनी पालकमंत्री दीपक केसरकर यांचे नाव न घेता टिका केली. तसेच महोत्सवासाठी आलेल्या कलाकारांना रात्रीचा त्रास देणार्‍या पोलिस कर्मचार्‍यांचा त्यांनी समाचारही घेतला.  अशा परिस्थिती उपस्थित कार्यकर्त्यांना आक्रमक बना असा संदेश त्यांनी दिला. यावेळी गायिका वैशाली सामंत, आदर्श शिंदे यावेळी उपस्थित होते.

Web Title: Sindhudurg News Sundarwadi Festival special