केसरकर- राणेंचा एकमेकांवर लक्ष ठेवण्यातच वेळ वाया - तटकरे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

सिंधुदुर्गनगरी - जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि महाराष्ट्र स्वाभिमानचे अध्यक्ष नारायण राणे हे एकमेकांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यातच वेळ वाया घालवत आहे. ते विकास काय करणार? अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत केली.

सिंधुदुर्गनगरी - जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि महाराष्ट्र स्वाभिमानचे अध्यक्ष नारायण राणे हे एकमेकांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यातच वेळ वाया घालवत आहेl. ते विकास काय करणार? अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत केली.

बेरोजगारी दूर करण्याचे आश्‍वासन देणाऱ्या सरकारने चुकीचे निर्णय घेत राज्यात बेरोजगारी निर्माण केली आहे. फसवेगिरी करुन सत्ता मिळविली आहे. सर्वच आघाडीवर हे सरकार अपयशी ठरले आहे. तरीही दुटप्पी धोरण ठेवणाऱ्या शिवसेनेत सत्तेतून बाहेर पडण्याची धमक राहिलेली नाही अशी टीकाही श्री. तटकरे यांनी केली.

राष्ट्रवादीच्या जिल्हास्तरीय मेळाव्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी राज्य महिला अध्यक्ष चित्राताई वाघ, जिल्हाध्यक्ष व्हिक्‍टर डान्टस, अबिद नाईक, प्रवीण भोसले आदी उपस्थित होते.

सत्ताधारी पक्षावर टीका करतांना श्री. तटकरे म्हणाले की हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. प्रत्येक योजना फसवी ठरली आहे. प्रत्येक निर्णय गोरगरीब जनतेला त्रासदायक ठरले आहे. सत्तेचा उपभोग घेणाऱ्या शिवसेनेची भूमिका दुटप्पी आहे. त्यांच्यावरील जनतेचा विश्‍वास आता उडाला आहे. जनतेसाठी बाहेर पडण्याची हुलकावणी देणाऱ्या शिवसेनेत सत्तेतून बाहेर पडण्याची धमक राहिलेली नाही. शिवसेनेचे येथील पालकमंत्री आमदार निष्क्रीय ठरले आहेत. त्यांचा प्रशासनावर धाक राहिलेला नाही. सर्व विकासकामे ठप्प झाली आहेत. महामार्गावरील खड्डे बुजवू शकत नाहीत ते सरकार जिल्ह्याचा विकास काय करणार.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री गृहराज्यंत्री आहेत त्यांचा कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्यांवर धाक नाही आणि कायदा राबविणाऱ्यांचा गुन्हेगारांवर धाक नाही. त्यामुळे महिलांवरील अत्त्याचारात वाढ झाली आहे. महिलांना फिरणेही मुश्‍कील झाले आहे. राज्याच्या क्राईमममध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे, असे श्री. तटकरे म्हणाले.

 8 नोव्हेंबर हा दिवस काळा दिवस पाळून या दिवशी राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल. या सरकारला जाग आणण्यासाठी रास्ता रोको, अधिकाऱ्यांच्या बंगल्यावर मोर्चा काढणे हाच पर्याय आहे.

सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष

Web Title: Sindhudurg News Sunil Tatakare Press