रस्त्याच्या वादातून माणगावात तणाव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जून 2018

कुडाळ - जमिनीच्या वादातून दोन गटांत माणगावमध्ये दोन गट एकमेकांना भिडले. यामुळे तणाव झाला. वाद विकोपास जाऊ नये, यासाठी अतिशीघ्र दलाच्या चार तुकड्यांना माणगावात पाचारण करण्यात आले. यामुळे मध्यरात्री माणगावला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले.

रस्त्याच्या कारणावरून दोन गट आमनेसामने भिडले होते. वेळीच अतिशीघ्र दलाचे जवान दाखल झाल्याने तणाव टळला. माणगाव-तळेवाडीतील भिसे कुटुंबीय आणि ग्रामस्थ यांच्यात जमिनीच्या वादावरून वाद निर्माण झाला होता. त्यामुळे याठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

रस्ता खुला करण्याबाबतची तहसीलदारांची नोटीस भिसे यांनी न स्वीकारल्याने वाद चिघळला होता. रस्ता खुला करण्यासाठी ग्रामस्थांसह महिलाही रस्त्यावर उतरल्या होत्या. पोलिस निरीक्षक अविनाश भोसले यांनी या वेळी मध्यस्थाची भूमिका घेतली. 

रस्ता खुला करण्याबाबत आज सकाळी फैसला होणार होता. मात्र, निर्णय झाला नाही. काही झाले तरी रस्ता खुला करणार, असा इशारा माणगावचे उपसरपंच सचिन धुरी यांनी दिला; तर तहसीलदारांच्या आदेशाने रस्ता खुला केला असल्याची माहिती उपसरपंच धुरी यांनी या वेळी दिली. रस्त्याबाबत न्यायालयीन लढाई लढणारच, असे भिसे कुटुंबीयांनी स्पष्ट केले.

Web Title: Sindhudurg News Tense situation in Mangaon