आंबोलीत वाघाचे दर्शन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

आंबोली - येथे काल रात्री ग्रामस्थांना पट्टेरी वाघाचे दर्शन झाले. साधारण तीन वर्षानंतर या भागात वाघ दिसला आहे.

आंबोलीत ते मांगेली आणि पुढे गोवा आणि कर्नाटकात पट्टेरी वाघाचा कॉरीडॉर आहे; मात्र येथे गेली तीन वर्षे वाघाचे दर्शन झाले नव्हते. काल रात्री आठच्या दरम्यान चौकुळमधील दत्ता गावडे आणि श्‍याम गवंडे यांना हा वाघ दिसला. येथील ओगले यांच्या हॉटेलच्या मागच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर त्यांना हा वाघ दिसला. आठ दिवसापूर्वी एका ट्रकचालकाला पूर्वीचा वस मंदिराजवळ पट्टेरी वाघ दिसला होता. गेले पंधरा दिवस चौकुळ परिसरात वाघाचा वावर असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

आंबोलीपासून खालच्या बाजूला कुंभवडे, असनिये ते दोडामार्गपर्यंत या आधीही पट्टेरी वाघाचा वावर आढळून आला आहे. आंबोली घाटातही बऱ्याचदा वाघाचे दर्शन झाले. गेली तीन वर्षे मात्र वाघ दिसला नव्हता. आता पुन्हा त्याचे आगमन झाले आहे.

Web Title: Sindhudurg News tiger seen in Amboli