सावंतवाडी मोती तलावात कासव दर्शन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

सावंतवाडी - संस्थानकाळात तलावात मोती मिळाल्यामुळे मोती तलाव म्हणून प्रसिध्द असलेल्या येथील तलावात सध्यस्थितीत  मोठ्या प्रमाणात कासव दिसत आहेत. येथील केशवसुत कट्ट्याच्या बाजूला मुंबई गोवा महामार्गाच्या बाजूने हे कासव लोकांना पहायला मिळत आहे. छोटे छोटे कासव रात्री दिसत असल्यामुळे अनेक नागरिक त्यांना पुन्हा तळ्यात सोडत आहेत.

सावंतवाडी - संस्थानकाळात तलावात मोती मिळाल्यामुळे मोती तलाव म्हणून प्रसिध्द असलेल्या येथील तलावात सध्यस्थितीत  मोठ्या प्रमाणात कासव दिसत आहेत. येथील केशवसुत कट्ट्याच्या बाजूला मुंबई गोवा महामार्गाच्या बाजूने हे कासव लोकांना पहायला मिळत आहे. छोटे छोटे कासव रात्री दिसत असल्यामुळे अनेक नागरिक त्यांना पुन्हा तळ्यात सोडत आहेत.

येथे मध्यभागी असलेल्या या तलावाला मोठा इतिहास आहे. त्याठिकाणी कवी केशवसुत, वसंत सावंत यांनी आपल्या कविता केल्या, तर दुसरीकडे शहराच्या सौंदर्यात या तलावाने मोलाची भूमिका बजावली. पालिकेने हा तलाव सुशोभित केला आहे. त्यासाठी दिव्याची मांडणी केली आहे. त्यामुळे नरेंद्र डोंगराच्या कुशीत वसलेला हा मोती तलाव येथे भेट देणाऱ्या पर्यटकांना भुरळ पाडतो.

पावसाळ्याच्या सुरवातीला केशवसुत कट्ट्याला लागून असलेल्या भागात मोठ्या प्रमाणात कासवाची पिल्ले रस्त्याच्या बाजूने किंवा फुटपाथवर पहायला मिळत आहेत. पहिल्याच पावसात बाजूला ती बाहेर पडली असावीत, असा अंदाज आहे; मात्र परिसरात फिरणारी ती पिल्ले पाहून अनेकांना त्यांना उचलून घेण्याचा मोह आवरत नाही, तर त्याच्या पलीकडे त्या छोट्या पिल्लांचा जीव वाचविण्यासाठी त्यांना अनेक नागरिक पुन्हा पाण्यात सोडतात.

‘त्या’ मोठ्या कासवाच्या आठवणींना उजाळा 
याबाबत नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना माहिती विचारल्यानंतर त्यांनी आश्‍चर्य व्यक्त केले आणि छोटे कासव असले तरी त्यांचे जतन होणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले. आपण लहान असताना तलावात दीड ते पावणे दोन फुट मोठा दगडा एवढा कासव होता आणि तो अनेक लोकांना दिसत असे, अशी माहिती आपल्या आजीने दिली होती, असे त्यांनी सांगत आठवणींना उजाळा दिला.

परिसरात फिरताना आढळून येणारे ते कासव तुपाळे कासव म्हणून ओळखले जातात. आपल्या भागात ते मोठ्या प्रमाणात आढळतात; मात्र तलावाच्या बाहेर आढळल्यामुळे ते नागरिकांना दिसत आहे; मात्र ते बाहेर दिसून आल्यास त्यांना पुन्हा नैसगिक अधिवासात सोडणे गरजेचे आहे.
- सुभाष पुराणिक, 

सहायक उपवनसंरक्षक, 
वन विभाग, सावंतवाडी  

Web Title: Sindhudurg News tortoise seen in Moti pond in Sawantwadi