अंधेरीतील पर्यटकाचा तोंडवळीत बुडून मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

मालवण - पर्यटनाचा आनंद लुटण्यास आलेल्या अंधेरी मुंबईतील पर्यटकाचा तोंडवळी मधली येथील समुद्रात बुडून मृत्यू झाला. तर दुसरा बचावला. ही दुर्घटना आज सायंकाळी साडे सहाच्या सुमारास घडली. सुभेंदू दास (वय 37, रा. मुंबई) असे मृताचे नाव आहे तर अर्जुन मोहन रॉय (वय 45, रा. मुंबई) यांच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविले. 

मालवण - पर्यटनाचा आनंद लुटण्यास आलेल्या अंधेरी मुंबईतील पर्यटकाचा तोंडवळी येथील समुद्रात बुडून मृत्यू झाला. तर एकाला वाचविण्यात यश आले आहे. ही दुर्घटना आज सायंकाळी साडे सहाच्या सुमारास घडली. सुभेंदू दास (वय 37, रा. मुंबई) असे मृताचे नाव आहे, तर अर्जुन मोहन रॉय (वय 45, रा. मुंबई) यांच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविले. 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, अंधेरी मुंबई येथील सहा ते सात जणांचा ग्रुप तोंडवळी येथे पर्यटनाचा आनंद लुटण्यास आला. आज सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास यातील अर्जुन मोहन रॉय व सुभेंदू दास हे दोघे समुद्रात पोहण्यास उतरले. तर त्यांचे कुटुंबीय किनाऱ्यावर होते. सध्या समुद्रात उधाणाची परिस्थिती असून याचा अंदाज न आल्याने हे दोघेही जण पाण्यात आत ओढले गेले. किनाऱ्यापासून सुमारे चारशे मीटर अंतरावर हे दोघेही पाण्यात गटांगळ्या खात असल्याचे किनाऱ्यावर उभ्या असलेल्या स्थानिकास दिसून आले. त्याने गावातील रूपेश नाईक, विवेक रेवंडकर, आनंद झाड, नाना पाटील, गौरव मालंडकर, विद्याधर पराडकर, उदय पाटकर यांना माहिती दिल्यावर या सर्वांनी किनाऱ्यावर धाव घेतली.

त्यांनी समुद्रात पोहत जात समुद्रात बुडत असलेल्या अर्जुन रॉय व सुभेंदू दास या दोघांना दोरीच्या साह्याने किनाऱ्यावर ओढत आणले. बराचवेळ समुद्रात गंटागळ्या खात राहिल्याने दोघांची प्रकृती चिंताजनक बनली होती. स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना तत्काळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र यातील सुभेंदू दास यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला तर अर्जुन रॉय यांना वाचविण्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांना यश आले. त्यांच्यावर उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसही ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले होते. तोंडवळी येथील समुद्रात दोघेजण बुडाल्याची माहिती मिळताच येथील ग्रामीण रुग्णालयात नागरिकांनी गर्दी केली होती. महाराष्ट्र स्वाभीमान पक्षाचे तालुकाध्यक्ष मंदार केणी, उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींनी भेट दिली. 

मित्रपरिवाराचा आक्रोश 
समुद्रात पोहताना बुडालेले सुभेंदू दास याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच त्यांच्या सहकाऱ्यांनी येथील ग्रामीण रुग्णालयात आक्रोश केला. 

 

Web Title: Sindhudurg news tourist dead