उसळलेल्या लाटांच्या तडाख्यात पर्यटक जखमी

अनंत पाताडे
रविवार, 10 जून 2018

मालवण - येथील राॅक गार्डन परिसरात काही पर्यटक समुद्राच्या लाटांच्या तडाख्याने दगडावर पडून जखमी झाले. सुदैवाने काहीही जीवितहाणी झाली नाही. उसळलेल्या समुद्राच्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी दगडावर बसलेल्या पर्यटकांचा अति उत्साहपणा नडला. 

मालवण येथे गेले दोन दिवस दमदार पाऊस कोसळत आहे. समुद्रही खवळलेला असल्याने जोरदार लाटा किनारपट्टीवर धडकत आहेत. मालवण रॉक गार्डन परिसरात लाटा अधिकच उसळत आहेत. अनेक पर्यटक या लाटांचा आनंद लुटतात. त्यात काही अतिउत्साही पर्यटकही असतात. शनिवारी सायंकाळी असेच काही अति उत्साही पर्यटक मालवणात दाखल झाले. रॉक गार्डन पार्कींग ठिकाणी मोटार पार्क करून हे युवक पोलीस वसाहत मागील खडकाळ परिसरात उसळणाऱ्या लाटांचा आनंद लुटत होते. दगडांवर बसून सेल्फीही घेत होते. 

हे दृश्य रॉक गार्डन व्यवस्थापक उमेश हर्डीकर यांनी पाहिले. त्या पर्यटकांना ओरडून सूचना केल्या. तर काहींनी पर्यटकांचा हा अतिउत्साही पणा मोबाईल कॅमेरात कैद केला. याचवेळी उसळलेली मोठी लाट पर्यटकांच्या अंगावर धडकली. यात हे पर्यटक दगडात फेकले गेले. लाटेच्या तडाख्याने हे पर्यटक जखमी झाले. शूटिंग करणारे पर्यटक या पर्यटकांना वाचवण्यासाठी धावले. सुदैवाने सर्व पर्यटक बचावले. या घटनेत हे पर्यटक किरकोळ जखमी झाले आहेत.

Web Title: Sindhudurg News tourist injured by current of Sea water