कुसुरमध्ये झाड कोसळून वाहतुक ठप्प

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

वैभववाडी - उंबर्डे मार्गावरील कुसुर पिंपळवाडी येथे रस्त्यावर झाड कोसळल्यामुळे या मार्गावरील वाहतुक तासभर ठप्प झाली. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. स्थानिक ग्रामस्थ आणि वाहनचालकांनी झाड हटवुन वाहतुक सुरळीत केली

वैभववाडी - उंबर्डे मार्गावरील कुसुर पिंपळवाडी येथे रस्त्यावर झाड कोसळल्यामुळे या मार्गावरील वाहतुक तासभर ठप्प झाली. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. स्थानिक ग्रामस्थ आणि वाहनचालकांनी झाड हटवुन वाहतुक सुरळीत केली. हा प्रकार आज सकाळी आठच्या सुमारास झाला.
वैभववाडीत या हंगामातील विक्रमी पाऊस झाला असून 114 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

तालुक्‍यात काल (ता.6) दुपारनंतर मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे काही भागातील झाडे उन्मळुन पडण्याचे प्रकार झाले आहेत; मात्र आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कुसुर पिपंळवाडी येथील श्रीराम मंदीरनजीक रस्त्यावर झाड कोसळले. त्यामुळे वैभववाडी-उंबर्डे मार्गावरील वाहतुक तासभर ठप्प झाली. रस्त्याच्या मधोमध झाड कोसळल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. स्थानिक ग्रामस्थ आणि वाहनचालकांनी झाडाचा काही भाग तोडुन एकेरी वाहतुक सुरू केली.

तालुक्‍यात काल सायकांळी मुसळधार पाऊस झाला. यावर्षी झालेला हा सर्वाधीक पाऊस असुन त्यांची नोंद 114 मिलीमीटर झाली आहे. आज सकाळपासुन पावसाची रिपरिप सुरू होती. काल झालेल्या पावसामुळे तालुक्‍यातील उत्तरेकडील कोरडे पडलेले नदी नाले वाहु लागले आहेत.

Web Title: Sindhudurg News tree fall near Kasur