वेंगुर्ला मुख्य रस्त्यावर पिंपळाचे झाड कोसळले

अनंत पाताडे
मंगळवार, 26 जून 2018

वेंगुर्ला - वेंगुर्ला येथील मुख्य रस्त्यावर जुनाट पिंपळाचा वृक्ष कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. तसेच या भागातील वीज पुरवठा व टेलीफोन सेवाही खंडित झाली.

वेंगुर्ला - वेंगुर्ला येथील मुख्य रस्त्यावर जुनाट पिंपळाचा वृक्ष कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. तसेच या भागातील वीज पुरवठा व टेलीफोन सेवाही खंडित झाली.

वेंगुर्ला हॉस्पीटल नाका मुख्य मार्गावरील सुमारे १०० वर्षे जुना पिंपळ आहे. आज पहाटे हा वृक्ष रस्त्यावर कोसळला. यामुळे 
सावंतवाडी - कुडाळ - कणकवली - मठ राज्य महामार्गावर जाणारी वाहतुक ठप्प झाली. पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु करण्यात आली आहे. पॉवर हॉऊस तुळस मार्ग व दाभोली मार्गे ही वाहतूक वळवण्यात आली असून वेंगुर्ला नगर परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, विदयुत महामंडळ व टेलीफोन कर्मचारी दाखल घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच मार्ग मोकळा करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. 

Web Title: Sindhudurg News tree fall on Vengurla Road