नवी मोटारसायकल चोरी प्रकरणी दोघांना अटक 

तुषार सावंत
सोमवार, 28 मे 2018

कणकवली - नवी कोरी मोटरसायकल चोरी करून तिला बनावट नंबर लावून तब्बल 15 दिवस मोटरसायकल वापरल्याप्रकरणी कणकवली परिसरातील दोघा तरूणांना पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. धुम स्टाईल मोटरसायकल चालवण्याच्या मौजेखातर तब्बल तिघांनी या गाडीची चोरी केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.

याप्रकरणी शावीअर सिरील फर्नाडीस (वय 19 रा. वरवडे फणसवाडी), मुक्तानंद उर्फ नंदू सखाराम नाईक (रा.वागदे) या दोघांना आज मध्यरात्री पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडील मोटरसायकलही ताब्यात घेण्यात आली आहे. या चोरीमागे चंद्रशेखर रामचंद्र चव्हाण (वय 18 रा.ओसरगाव) याचाही सहभाग असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. 

शहरातील पोयेकरवाडी येथे विनायक उबाळे (वय 33) यांची मोटरसायकल 14 मे रोजी रात्री चोरीस गेली होती. नव्याने खरेदी केलेली मोटरसायकल राहत्या घराच्या आवारातच लावून ठेवली होती. या तिघा संशयितांनी ढकलत नेवून या गाडीची चोरी केली. त्यानंतर बनावट नंबर लावून तिचा वापर केला. गावातील काही लोकांना संशय आल्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. गाडीच्या कागदपत्राची विचारणा केल्यानंतर मोटरसायकल चोरीची कबुली दोघा संशयितांनी दिली आहे. 

Web Title: Sindhudurg News two arrested in motorcycle robbery