खारेपाटण येथे वीजेच्या धक्क्याने आई, मुलाचा मृत्यू

तुषार सावंत
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

कणकवली - खारेपाटण येथे विजेचा धक्का लागून आई व मुलगा जागीच ठार झाले. आज दुपारी कपडे वाळत घालत असतानाही घटना घडली. 

कणकवली - खारेपाटण येथे विजेचा धक्का लागून आई व मुलगा जागीच ठार झाले. आज दुपारी कपडे वाळत घालत असताना
ही घटना घडली. 

संजय बाळकृष्ण शिंदे (वय 35) व त्यांची आई भाग्यश्री बाळकृष्ण शिंदे (वय 60, खारेपाटण हसोलटेंब, कोंडवाडी) अशी मृतांचे नावे आहेत.  ही दुर्घटना दुपारी बाराच्या सुमारास घडली. कपडे वाळत घालत असताना भाग्यश्री यांना विजेचा धक्का बसला. त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या संजय यांनाही धक्का बसल्याने. दोघेही जागीच मृत झाले. 

Web Title: Sindhudurg News two dead due to electric shock