मालवण तालुक्यात दोन भावंडांचा बुडून मृत्यू 

तुषार सावंत 
रविवार, 11 मार्च 2018

कणकवली - गोठणे (ता. मालवण) येथील नदीच्या डोहोत बोटींग करत असताना बोट पलटली. या अपघातामध्ये दोघा भावंडांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर एक बहीण सुदैवाने बचावली.

कणकवली - गोठणे (ता. मालवण) येथील नदीच्या डोहोत बोटींग करत असताना बोट पलटली. या अपघातामध्ये दोघा भावंडांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर एक बहीण सुदैवाने बचावली. ही दुर्घटना आज सकाळी 11 च्या सुमारास गडनदी पात्रात गोठणे आणि किर्लोस दरम्यान घडली. सुवर्णा दशरथ आचरेकर (वय 25) व तिचा भाऊ आकाश आचरेकर (वय 20) अशी मृतांची नावे आहेत.

याबाबत माहिती अशी की, आचरेकर कुटुंबातील तीन भावंडे सकाळी अकराच्या सुमारास गडनदीमध्ये कपडे धुण्यासाठी आली होती. या पात्रात उभी असलेल्या एका फायबर बोटीमधून त्यांनी डोहात जाण्याचा प्रयत्न केला. पण बोट पलटी झाल्याने दोन भावंडे खोल डोहात बुडाली. दिपाली हिला पोहता येत असल्याने ती वाचली. तिने एका झुडपाचा आधार घेत स्वतःचा जीव वाचविला.  

मृत देह बाहेर काढण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडे कोणतीही सुविधा नसल्याने याकामात अडचणी येत आहेत. स्थानिक ग्रामस्थांनी सुवर्णाचा मृतदेह बाहेर काढला असून आकाश याचा मृतदेह दुपारी उशिरापर्यंत मिळाला नव्हता. सुवर्णा ही काही दिवसापूर्वी मुंबईहून आली होती. 

 

Web Title: Sindhudurg News two sink in Malvan Gothane