पॉस मशीनला अडचणी आल्यास पावतीद्वारे रेशन - वैभव नाईक

राजेश सरकारे
बुधवार, 13 जून 2018

कणकवली -  रेशन दुकानावरील पॉस मशिनमध्ये नेटवर्कचा अडथळा आल्यास पावतीद्वारे रेशन मिळणार आहे. त्याबाबतचे निर्देश पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिले असल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.

कणकवली -  रेशन दुकानावरील पॉस मशिनमध्ये नेटवर्कचा अडथळा आल्यास पावतीद्वारे रेशन मिळणार आहे. त्याबाबतचे निर्देश पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिले असल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.

सिंधुदुर्गातील रेशन व्यावसायिकांच्या समस्यांबाबत श्री.नाईक यांनी मंगळवारी (ता.12) अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री.बापट यांची मुंबईत भेट घेतली. यात त्यांनी नेटवर्क नसल्याने जिल्ह्यातील रेशन दुकानांवरील व्यवहार ठप्प होत असल्याची माहिती दिली. यानंतर पॉस मशिनमधील समस्यांबाबतचा आढावा श्री.बापट यांनी घेतला. तसेच पॉस मशिनला नेटवर्क किंवा अन्य अडचणी असतील त्यावेळी पूर्वीप्रमाणे पावतीद्वारे रेशन दिले जावे असे निर्देश पुरवठा विभागांना देण्यात आले आहेत.

दरम्यान आमदार नाईक यांनी सिंधुदुर्गातील भौगोलिक परिस्थितीची माहिती श्री.बापट यांना दिली. सिंधुदुर्गात 192 रास्त भाव धान्य दुकाने आहेत. यातून धान्य वितरणासाठी इ पॉस मशीन देण्यात आल्या आहेत. मात्र सध्या जिल्ह्यात नेटवर्कची समस्या असल्याने ग्राहकांना पॉस मशीन द्वारे धान्य वितरित करताना दुकानदारांना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे अनेक ग्राहकांना धान्य न घेताच माघारी जावे लगत असल्याच्या समस्या श्री.नाईक यांनी मांडल्या. 

Web Title: Sindhudurg News Vaibhav Naik press