वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा लवकरच मुहूर्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

वैभववाडी - प्रतीक्षेत असलेल्या वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गाच्या कामाला लवकरच सुरूवात होणार आहे. केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे झालेल्या कोकण रेल्वेच्या आढावा बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. मार्गासाठी लागणाऱ्या निधीपैकी ५० टक्के निधी भारतीय रेल्वे तर उर्वरित ५० टक्के निधी महाराष्ट्र शासन उपलब्ध करून देणार आहे.

वैभववाडी - प्रतीक्षेत असलेल्या वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गाच्या कामाला लवकरच सुरूवात होणार आहे. केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे झालेल्या कोकण रेल्वेच्या आढावा बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. मार्गासाठी लागणाऱ्या निधीपैकी ५० टक्के निधी भारतीय रेल्वे तर उर्वरित ५० टक्के निधी महाराष्ट्र शासन उपलब्ध करून देणार आहे.

यापैकी पहिल्या स्थानाकचे काम अवघ्या पाच महिन्यांत पूर्ण करून जानेवारी २०१९ मध्ये त्याचे उद्‌घाटन करण्याचाही निर्धार कोकण रेल्वेने व्यक्त केला आहे. यामुळे कोकण रेल्वेचा पश्‍चिम महाराष्ट्रारातील दिमाखदार प्रवेश नजरेच्या टप्प्यात आला आहे. 

१०३ किलोमीटर लांबीच्या वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गाचे दोन वर्षापूर्वी सर्वेक्षण केले होते. त्यानंतर तत्कालीन रेल्वेमंत्री यांनी या मार्गाच्या सर्वेक्षणासाठी २७० कोटीची तरतूद केली होती. गेल्याच वर्षी कोल्हापूर येथे रेल्वेमार्गाचे भूमिपूजन झाले होते; परंतु त्यानंतर होणारे अंतिम सर्वेक्षणासह प्रकल्प पुढे रेटण्याच्या अनुषंगाने कोणत्याही हालचाली दिसून येत नव्हत्या. त्यामुळे कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या या रेल्वेमार्गाविषयी साशंकता व्यक्त केली जात होती.

केंद्रीय वाणीज्य व उद्योगमंत्री श्री. प्रभू यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे कोकण रेल्वेची आढावा बैठक झाली. बैठकीला कोकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत नियोजीत वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गाविषयी सकारात्मक चर्चा झाली. विकासाला चालना देणाऱ्या या मार्गाला केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली असून भारतीय रेल्वे या प्रकल्पाला येणाऱ्या खर्चाचा ५० भार उचलणार आहे तर उर्वरित ५० टक्के निधी महाराष्ट्र शासन उपलब्ध करून देईल. त्यामुळे लवकरच या मार्गाचे काम सुरू होणार असल्याचे त्यांनी बैठकीत स्पष्ट केले. हा मार्ग कोकण आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेकरीता उपयुक्त ठरेल असेही श्री. प्रभूनी स्पष्ट केले आहे.

कोकण रेल्वेने अधिकाधिक गावे जोडण्याच्या दृष्टीने या बैठकीत चर्चा झाली. कोकण रेल्वेमार्गावर दहा रेल्वेस्थानकाचे काम सुरू असून त्यातील पहिल्या रेल्वे स्थानकाचे उद्‌घाटन जानेवारी २०१९ मध्ये होईल, अशी माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बैठकीत दिली.

रेल्वेमंत्री असताना वैभववाडी-कोल्हापूर मार्गाकरीता पुढाकार घेतलेल्या मंत्री प्रभूनी पुन्हा एकदा हा प्रकल्प मार्गी लागण्याच्या दृष्टीने पाऊल उचलल्यामुळे या मार्गाविषयीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. नियोजित वैभववाडी-कोल्हापूर हा रेल्वेमार्ग १०३ किलोमीटरचा राहणार असून त्याकरीता अंदाजे ३ हजार ३०० कोटी खर्च येणार आहे. रेल्वेमार्गावर पाच स्थानके, पाच बोगदे, चार मोठे पूल असणार आहेत. पाच वर्षांत रेल्वेमार्ग पूर्ण करण्याचे सुरूवातीला नियोजन होते.

अनेकांना रोजगार मिळणार
रत्नागिरी जिल्ह्यात वैभववाडीजवळ इंडियन ऑयल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिन्दुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येत आहे. यासाठी ४० अब्ज डॉलरचा निधी लागणे अपेक्षित आहे.  हा प्रकल्प २०२२ पर्यंत तयार झाल्यावर या प्रकल्पातून दरवर्षी ६० लाख मेट्रिक टन तेल शुध्दीकरण होऊ शकते. यामुळे अनेकांना रोजगार मिळणार आहेत. याकरिता या रेल्वे मार्गाचे विशेष महत्त्व आहे.

मार्गावरील स्थानके
कोकणातील लहान शहरे तसेच गावांना रेल्वेचा लाभ व्हावा, यासाठी कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गावर नवीन दहा स्थानके असतील. 
ही स्थानके अशी ः इंदापूर, गोरेगाव, सापे-वामने, कळंबी, कडवाई, वेरावळी, खेरे पाटण, अछीमे, मिरज व इनांजे. 

Web Title: Sindhudurg News Vaibhavwadi-Kolhapur