आंबा संशोधनावर वेंगुर्लेतील परिषदेत प्रकाशझोत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

वेंगुर्ले - जगभरात आंबा विषयावर होत असलेले संशोधन आजच्या विविध चर्चासत्रातून मांडण्यात आले. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि इंटरडिसिप्लिनरी सोसायटी फॉर अॅडव्हान्समेंट ऑफ अॅग्रीकल्चर सायन्सेस अँड टेक्‍नॉलॉजी यांच्यावतीने प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय आंबा परिषदेत विविध चर्चासत्रे झाली.

पहिल्या सत्रात आंब्याची जागतिक स्तरावरील सद्य:स्थिती या विषयाचे प्रमुख सादरीकरण डॉ. व्हिक्‍टर गॅलन यांनी केले. या आंबा परिषदेला अमेरिका, ऑस्ट्रेलिया, चीन, स्पेन थायलंड इत्यादी देशातून शास्त्रज्ञ उपस्थित असून, त्यांच्या संशोधनात्मक अहवालाचे वाचन ते विविध सत्रात करत आहेत.

दुसऱ्या सत्रात चार्ल्स डार्विन विद्यापीठ, ऑस्ट्रेलियाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. पिंग लु आणि चियांग माई, विद्यापीठ थायलंडच्या डॉ. श्रीमती दारूनी नेफोन यांनी जागतिक स्तरावरील वातावरणातील फरक आणि त्याचा आंबा उत्पादनावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास याचे सादरीकरण केले. तिसऱ्या सत्रात आंब्यातील अनुवंशिकता व प्रजोत्पादन या विषयावरील प्रमुख सादरीकरण राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळेच्या प्रमुख वैज्ञानिक डॉ विद्या गुप्ता यांनी केले. याच सत्रात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीच्या उद्यानविद्या विभागाचे प्रमुख डॉ. भरत साळवी यांनी सादरीकरण केले.

आंब्याच्या शाश्‍वत उत्पादनाकरिता कृषी तंत्रज्ञान या विषयाचे प्रमुख सादरीकरण जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ रिलायन्स उद्योग समूह जामनगरचे माजी उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र गुंजाटे यांनी केले. याच सत्रात तामिळनाडू  कृषी विद्यापीठ कोईमतुरचे अधिष्ठाता डॉ. एन कुमार यांचेही सादरीकरण झाले. दुसऱ्या सत्रात आंबा शेतीमधील यांत्रिकीकरण या विषयावरील प्रमुख सादरीकरण डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोल्याचे माजी कुलगुरू डॉ. व्यंकटेश मायंदे यांनी केले. तर तिसऱ्या सत्रात डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाच्या कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. यशवंत खांदेतोड यांचेही सादरीकरण झाले.

Web Title: Sindhudurg News Vegurle Mango conference