आधीच्या उमेदवाराकडून मतदारांचा भ्रमनिराश - विनायक राऊत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

कुडाळ - शिवसेनेचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संजय मोरे यांना पाचही जिल्ह्यात मतदारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. यापूर्वीच्या उमेदवाराने मतदाराचा भ्रमनिराश केला. निवडून आल्यानंतर मतदारांकडे ढूंकूनही पाहिले नाही. त्यामुळे आमचा उमेदवार मोठ्या मतांनी विजयी होणार, असा दावा शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत यांना व्यक्‍त केला.

कुडाळ - शिवसेनेचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संजय मोरे यांना पाचही जिल्ह्यात मतदारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. यापूर्वीच्या उमेदवाराने मतदाराचा भ्रमनिराश केला. निवडून आल्यानंतर मतदारांकडे ढूंकूनही पाहिले नाही. त्यामुळे आमचा उमेदवार मोठ्या मतांनी विजयी होणार, असा दावा शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत यांना व्यक्‍त केला.

कोकण पदवीधर मतदार संघाची निवडणूक 25 जूनला होत आहे. या निवडणूकीत शिवसेनेचे ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे रिंगणात आहेत. प्रचार आणि मतदारांच्या गाठीभेटी या अनूषंगाने खासदार राऊत म्हणाले, ""कोकण आणि शिवसेना एक वेगळे नाते आहे. यापूर्वी या मतदारसंघातून निवडून गेलेल्या उमेदवाराने मतदारांचा सर्वच बाबतीत भ्रमनिराश केला आहे. निवडून आल्यानंतर त्यांनी मतदारांकडे ढूंकूनही पाहिले नाही. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वसामान्यांसाठी शिवसेनेची स्थापना केली. शिवसेनेच्या वचननामा हा आश्‍वासनांचा नसतो तर तो प्रत्यक्षात कार्यवाहीचा असतो. श्री. मोरे यांच्या प्रचारार्थ ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाचही जिल्ह्यात मतदारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. शिक्षक व पदवीधर यांचे अनेक प्रश्‍न आजतागायत मार्गी लागले नाहीत. 2005 च्या निवृत्ती वेतनाचा प्रश्‍न त्यांना पूर्वीप्रमाणे मिळावा यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. शिक्षक व पदवीधराचे जे काही प्रश्‍न आहेत ते शिवसेनेच्या माध्यमातून निश्‍चितच मार्गी लावू. आज सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यघत शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक युवासैनिक जोमाने कामाला लागले आहेत. कोकण पदवीधर मतदार संघाचा गड शिवसेनेने उचलण्याचा निर्धार केला आहे. तो निर्धार मतदारांच्या माध्यमातून पूर्णत्वाला जाणार आहे. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी श्री. मोरे यांना उमेदवारी दिली. ठाणे महानगरपालिकेत श्री. मोरे यांची नगरसेवक म्हणून दमदार सुरूवात झाली. त्याची कार्यतत्परता, जनमाणसात असणारा संपर्क, सामाजिक क्षेत्रातील वावर आदी विविधांगीमुळे ते 1914 ते 17 या कालावधीत ठाण्याचे महापौर झाले. त्यांनी नगरसेवक ते महापौर या कालावधीत शिवसेनेला सर्वसामान्यांसह सर्वांनाच साजेसे असे काम केले. त्यांची पोचपावती म्हणून कोकण पदवीधर मतदारसंघासाठी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी त्यांना उमेदवारी दिली.''

Web Title: Sindhudurg News Vinayak Raut comment