मतदान अन्‌ राजकीय जुगलबंदी

अमोल टेंबकर
मंगळवार, 22 मे 2018

सावंतवाडी -  इतर निवडणुकात आपापल्या पक्षाची वेगळी चुल मांडणारे, आरोप प्रत्यारोप करणारे आज सर्वपक्षिय नेते येथे एकत्र आले. यानिमित्ताने त्या सर्वात जोरदार खुशमस्करी सुरू होती; मात्र त्यात शिवसेनेचे पदाधिकारी या सर्वापासून दुरू होते. निमित्त होत ते कोकण विधान परिषद निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाचे.

सावंतवाडी -  इतर निवडणुकात आपापल्या पक्षाची वेगळी चुल मांडणारे, आरोप प्रत्यारोप करणारे आज सर्वपक्षिय नेते येथे एकत्र आले. यानिमित्ताने त्या सर्वात जोरदार खुशमस्करी सुरू होती; मात्र त्यात शिवसेनेचे पदाधिकारी या सर्वापासून दुरू होते. निमित्त होत ते कोकण विधान परिषद निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाचे.

येथील विधानसभा मतदार संघातील सावंतवाडीसह वेंगुर्ले, दोडामार्ग या तालुक्‍यातील मतदान आज येथे झाले. या मतदानासाठी एरव्ही एकमेकांच्या विरोधात असलेले राजकीय पदाधिकारी एकत्र दिसले.

यात भाजपाचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार राजन तेली, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विकास सावंत, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्हीक्‍टर डान्टस, महाराष्ट्र स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष संजू परब, नगराध्यक्ष बबन साळगावकर, वेंगुर्ले नगराध्यक्ष राजन गिरप, जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर, भाजपाचे राजन म्हापसेकर, मनोज नाईक, मंगेश तळवणेकर, आनंद नेवगी, सुधीर आडीवरेकर, मनिष दळवी, अंकुश जाधव आदींचा समावेश होता. मतदानाच्या निमित्ताने आज सर्व पदाधिकारी एकत्र आले. यात रंगलेली जुगलबंदी अनेकांना पहायला मिळाली.

वेंगुर्लेचे माजी नगराध्यक्ष संदेश निकम आणि राजन तेली यांच्यात चर्चा सुरू असताना ‘आत्ता तुम्ही विधानसभा लढवतालात मा ओ इकडे या नाहीतर तुमका कणकवलीत पाठवतलो’, अशी कोटी निकम यांनी केली. यावर तेली हसत हसत त्याठिकाणी आले. त्यात पुन्हा एकदा हास्याची लकेर उमटली.

या निवडणुकीत सर्वपक्षियविरुद्ध शिवसेना अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शिवसेनेचे पदाधिकारी मात्र बाजूलाच होते. यात तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा, राजन मुळीक, दोडामार्गचे बाबूराव धुरी, नगरसेवक सुरेंद्र बांदेकर आदी पदाधिकारी एका बाजूला होते.

कोणाच्या चेहऱ्यावर चिंता?
स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष संजू परब, राजन तेली एकत्र आले. दोघांनी एकमेकांना उपस्थित पत्रकारांसमोर आलिंगन दिले. या वेळी श्री. परब यांनी आता पुढची विधानसभा लक्षात घेता कोणाच्या चेहऱ्यावर चिंता दिसते ती बघा अशी कोटी केली. या वेळी तेली यांनी आम्ही नेहमीच तयार असतो, असे सांगितले.

Web Title: Sindhudurg News voting and political Jugalbandi