सिंधुदुर्गातील धरणांच्या पाणी साठ्यात लक्षणीय वाढ

तुषार सावंत 
गुरुवार, 21 जून 2018

कणकवली - सिंधुदुर्गात पावसाचा जोर वाढल्यामुळे जिल्ह्यातील आंतरराज्य तिलारी या मोठ्या प्रकल्पात 26.24 टक्के, देवघर मध्य पाटबंधारे प्रकल्पात 17.61 तर कोर्लेसातंडी प्रकल्पात 100 टक्के मिळून जिल्ह्यातील उर्वरीत 28 लघुपाटंबधारे प्रकल्प धरणक्षेत्रात सरासरी 26.37 टक्के इतका पाणी साठा झाला आहे.

कणकवली - सिंधुदुर्गात पावसाचा जोर वाढल्यामुळे जिल्ह्यातील आंतरराज्य तिलारी या मोठ्या प्रकल्पात 26.24 टक्के, देवघर मध्य पाटबंधारे प्रकल्पात 17.61 तर कोर्लेसातंडी प्रकल्पात 100 टक्के मिळून जिल्ह्यातील उर्वरीत 28 लघुपाटंबधारे प्रकल्प धरणक्षेत्रात सरासरी 26.37 टक्के इतका पाणी साठा झाला आहे.

जिल्ह्यात पावसाचा जोर गेल्या चार दिवसापासून वाढला असून सर्वाधिक पाऊस मालवण तालुक्‍यात झाला आहे. भात पेरणीनंतर लावणीच्या कामाला दमदार सुरूवात झाली आहे. 
सिंधुदुर्गात जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाला सुरूवात झाली. याचवेळी भातपेरणी सुरू झाली.

 • किनारपट्टीत पावसाचे प्रमाण वाढले 
 • सिंधुदुर्गात एकूण 8318.9 मिलीमीटर पाऊस
 • जिल्ह्यात सरासरी 1347.0 मिलीमीटर पावसाची नोंद
 • सर्वाधिक पाऊस मालवण 1526.0 मिलीमीटर 

मृगनक्षत्रानंतर सातत्याने मुसळधार पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाईचे सावट दूर झाले. पावसानंतर नदी नाले, विहीरींची पाणीपातळी वाढली. परिणामी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असून शेतकरीही सुखावला आहे. सद्यस्थितीत सर्व धरणामध्ये एकूण 730.827 द.ल.घ.मी. इतका पाणीसाठा असून उपयुक्त पाणीसाठा 192.727 द.ल.घ.मी. आहे. गतवर्षी याच दिवशी पाणीसाठा 34.9 टक्के इतका होता. 

गुरूवारी 24 तासात झालेला पाऊस असा ः 

 • दोडामार्ग - 37 मिमी. (770 मिलीमीटर)
 • सावंतवाडी - 165 मिमी. (837 मिलीमीटर)
 • वेंगुर्ला - 319 मिमी. (1345.8 मिलीमीटर)
 • कुडाळ - 167 मिमी. (1023.1 मिलीमीटर)
 • मालवण - 345 मिमी. (1526 मिलीमीटर)
 • कणकवली - 88 मिमी. (674 मिलीमीटर)
 • देवगड - 186 मिमी. (1445 मिलीमीटर)
 • वैभववाडी - 40 मिमी. (698 मिलीमीटर)

लघुपाटबंधारे प्रकल्पात टक्केवारीप्रमाणे साठा असा ः शिवडाव 34.83, नाधवडे 46.21, ओटव 43.61, देदोनवाडी 5.00, तरंदळे 30.34, आडेली 21.82, आंबोली 56.41, चोरगेवाडी 37.09, हातेरी 50.13, माडखोल 100, निळेली 48.03, ओरोसबुद्रुक 8.81, सनमटेंब 46.78, तळेवाडी डिगस 11.94, दाबाचीवाडी 32.63, पावशी 81.45, शिरवल 12.12, पुळास 33.62, वाफोली 20.21, कारिवडे 7.80, धामापूर 40.60, हरकुळ खुर्द 97.77, ओसरगाव 17.33, ओझरम 68.72, पोईप 18.49, शिरगाव 3.16, तिथवली 32.39 आणि लोरे 38.06 टक्के इतका पाणी साठा झाला आहे. 

Web Title: Sindhudurg News water level in Dams