गिरोडे, घोटगाचीवाडीत पाण्यासाठी वणवण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 नोव्हेंबर 2017

दोडामार्ग - वझरे ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक नळयोजनेचे दोन्ही मोटारपंप बंद पडल्याने गिरोडे आणि घोटगाचीवाडी येथील ग्रामस्थांवर पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे. गिरोडे आणि घोटगाचीवाडी यथील ग्रामस्थांसाठीचा पाणी पुरवठा गेले पाच दिवस बंद असल्याने वस्तीपासून खूप दूर जंगल भागात असलेल्या विहिरीवरुन दगडधोंडे तुडवत अडचणीच्या वाटेतून पाणी आणावे लागते आहे.

दोडामार्ग - वझरे ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक नळयोजनेचे दोन्ही मोटारपंप बंद पडल्याने गिरोडे आणि घोटगाचीवाडी येथील ग्रामस्थांवर पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे. गिरोडे आणि घोटगाचीवाडी यथील ग्रामस्थांसाठीचा पाणी पुरवठा गेले पाच दिवस बंद असल्याने वस्तीपासून खूप दूर जंगल भागात असलेल्या विहिरीवरुन दगडधोंडे तुडवत अडचणीच्या वाटेतून पाणी आणावे लागते आहे.

गिरोडे गावातील ग्रामस्थांनी त्यासंदर्भात आज गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले. गिरोडे येथे सार्वजनिक नळयोजनेची उपसा विहीर आहे. तेथून साठवण टाकीत पाणी नेऊन ते गिरोडे आणि घोटगाचीवाडी येथील ग्रामस्थांना वितरीत केले जाते. गेले पाच दिवस त्या वाडीवरील ग्रामस्थांचा पाणी पुरवठा बंद आहे. उपसा विहिरीवरील दोन्ही मोटारपंप बंद आहेत. पहिल्यांदा एक पंप बंद पडला होता; मात्र दुसरा पंप सुरु असल्याने ग्रामपंचायतीने नादुरुस्त पंप दुरुस्त करण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे दुसरा पंपही बंद पडताच लोकांना पाणी पुरवठा बंद होवून गावकऱ्यांवरच पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे.

गावातील पुरुष, महिला, मुली, वृद्धा सगळ्यांना आता पाण्यासाठी जंगल भागातील सार्वजनिक नळयोजनेच्या उपसा विहिरीवर पाणी आणण्यासाठी जावे लागत आहे. विहिरीवर जाणारा रस्ता दगडधोंड्यांचा, चिंचोळा, जंगलभागातून जाणारा आणि तीव्र चढ उताराचा आहे. पाण्याच्या भरलेल्या कळशा घेऊन दगडधोंडे चुकवत, तीव्र चढ आणि निसरड्या पाऊलवाटेने चढून घर गाठणे जीकिरीचे काम आहे; पण पाण्यासाठी गावकरी जीव मुठीत घेऊन गेले पाच दिवस त्या वाटेवरुन चालत आहेत. वयोवृद्ध महिलांना चढण चढताना धाप लागते. ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष, बंद पडलेला पंप दुरुस्त करण्यामधील बेपर्वाई गावकऱ्यांसाठी त्रासदायक ठरली आहे. त्यामुळे नादुरुस्त पंप तात्काळ दुरुस्त करुन पाणी पुरवठा पूर्ववत करावा अशी मागणी होत आहे.

ठेकेदाराने हात धुतले
गिरोडेतील प्राथमिक शाळेजवळ अंगणवाडी इमारत बांधकाम सुरु आहे. त्यासाठी पाण्याची स्वतंत्र व्यस्था ठेकेदाराने करायला हवी; पण ती न करता त्याने सार्वजनिक नळयोजनेचे पाणी सातत्याने वापरले त्याबद्दल लोकांची तक्रार आहे. त्याविरोधात कारवाईची मागणी होत आहे.

Web Title: Sindhudurg News water scarcity in Ghotagawadi, Girode

टॅग्स