तेरवण मेढेत स्वच्छतेसाठी महिलांची एकी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017

दोडामार्ग -  स्वच्छतेतून समृद्धी आणण्यासाठी तेरवण मेढे मधील महिलाही पुढे सरसावल्या आहेत. केवळ बचतगट आणि घर चालवून न थांबता बचतगटातील महिलांनी गावातील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ग्रामस्वच्छतेच्या अभियानात सक्रिय सहभाग घेतला आहे.

दोडामार्ग -  स्वच्छतेतून समृद्धी आणण्यासाठी तेरवण मेढे मधील महिलाही पुढे सरसावल्या आहेत. केवळ बचतगट आणि घर चालवून न थांबता बचतगटातील महिलांनी गावातील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ग्रामस्वच्छतेच्या अभियानात सक्रिय सहभाग घेतला आहे.

तेरवण मेढेचे सरपंच प्रवीण गवस यांच्या पुढाकारातून तेरवणमध्ये ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यावेळी तेथील ग्रामपंचायत सदस्यांसह गावातील स्त्री-पुरुष सहभागी झाले होते.

स्वच्छतेतून समृद्धी आणण्यासाठी आणि स्वच्छता हीच सेवा मानून सर्व वयोगटांतील स्त्री-पुरुष अभियानात सहभागी झाले होते. सरपंच गवस यांच्यासह समुदाय विकास व क्षमता बांधणीतज्ज्ञ रूपाजी किनळेकर, सुभाष नाईक, समीर नाईक, अर्जुन गवस यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य सगुण गवस, सुप्रिया गवस, ग्रामसेवक सचिन चव्हाण, आशा स्वयंसेविका जयमाला गवस, मनोहर गवस, वामन गवस, सुभाष गवस, सर्व महिला बचतगटांतील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री. किनळेकर यांनी श्रमदानापूर्वी उपस्थितांना स्वच्छतेविषयी मार्गदर्शन केले. 

गावातील मंदिर परिसर, शाळा परिसर, मुख्य रस्त्याची साफसफाई सर्वांनी केली. त्यात बचतगटातील महिलांचा मोठा सहभाग होता.राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून बचतगटांना दशसूत्रीचे प्रशिक्षण देण्यात येते. त्यात सामाजिक बांधिलकी जपण्याबाबत आणि वैयक्तिक तसेच सार्वजनिक स्वच्छतेबाबत जागरुक राहण्याबाबत मार्गदर्शन केले जाते. त्या प्रशिक्षणामुळे तेरवण मेढेतील महिला सजग झाल्याचे त्यांच्या श्रमदानातून स्पष्ट होत आहे. राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या उमेद अभियानाने महिलांमध्ये आत्मविश्‍वास आणि समाज आणि आरोग्य, स्वच्छता याबात सकारात्मक विचार करण्याची जाणीव जागृती केली असेच म्हणावे लागेल.

Web Title: Sindhudurg News women unity for cleanness