तळवडेत कुंभारवाडीतील वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह मिळाला

अमोल टेंबकर
मंगळवार, 12 जून 2018

सावंतवाडी - तळवडे कुंभारवाडी येथे पुराच्या पाण्यात पाहून गेलेल्या सुभाष चंद्रकांत शिरोडकर यांचा शोध आज सकाळी लागला. परिसरातील आनंद कुबडे यांच्या जमिनीत सुभाष यांचा मृतदेह आढळून आला आहे. मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असून प्रकाश परब, पंकज पेडणेकर सरपंच मदतकार्यात सहभागी झाले आहेत.

तालुक्‍यात रविवारी (ता. १०) झालेल्या पावसात श्री. शिरोडकर हे पाय घसरून नदीत कोसळल्याने पाण्यात वाहून गेले होते; मात्र त्यांचा शोध घेऊनही ते मिळाले नव्हते. त्यामुळे आपत्कालीन पथकाच्या मदतीने तळवडे, होडावडा, मातोंड आणि मोचेमाड परिसरातील काही भागांत शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र, उशिरापर्यंत त्यांचा शोध लागला नाही. त्यामुळे पथक माघारी परतले. शोध घेण्यासाठी मालवण येथील स्कुबा डायव्हिंगसह अन्य एक पथक, सांगेली येथील बाबल अल्मेडा टीम आणि मळेवाड येथील बापू मुळीक आदींनी त्यांचा पाण्यात उतरून शोध घेण्याचा प्रयत्न केला. तब्बल सहा तास ही शोधमोहीम राबविली; मात्र काहीच हाती न लागल्याने अखेर सोमवारी दुपारी चारला ही मोहीम थांबविण्यात आली. 

रवी काजरेकर, गिरीश शिरोडकर, संदीप आंगचेकर, प्रसाद परब, समीर रेडकर, तुकाराम परब, किशोर परब, विनोद वराडकर, भूषण पेडणेकर, रवी सावंत, विलास परब, दादा परब, प्रमोद गावडे, जिल्हा परिषदेचे सदस्य उत्तम पांढरे, पंचायत समितीचे सदस्य पंकज पेडणेकर, सरपंच रवींद्र कोरगावकर, पोलिसपाटील धोंडी राऊळ, तलाठी श्रीमती मसूरकर, श्री. पवार आदींनी त्याठिकाणी धाव घेतली. 

या वेळी तहसीलदार कदम, नायब तहसीलदार शशिकांत जाधव उपस्थित होते. 

Web Title: Sindhudurg News youth body found in farm