Sindhudurg : वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्यांविरुद्ध मोहीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sindhudurg

Sindhudurg : वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्यांविरुद्ध मोहीम

सावंतवाडी : वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणाऱ्या शहरातील विक्रेत्यांविरोधात पालिकेच्या आरोग्य विभागाने आज पोलिसांना सोबत घेत कारवाईची मोहीम हाती घेतली. यावेळी अनेक विक्रेत्यांना वाहतूक कोंडी होऊ नये, अशा ठिकाणी बसून व्यवसाय करा, असे सुचित केले. शहरामध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातून महिलावर्ग तसेच परप्रांतीय व्यवसाय निमित्ताने येतात. रस्त्याच्या कडेला बसून हा व्यवसाय केला जातो.

व्यवसाय करताना पालिकेचा रितसर कर भरलाही जातो; परंतु बऱ्याच वेळा या विक्रेत्या शहरात वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरतात. त्यामुळे पोलिस यंत्रणेकडून थेट पालिका प्रशासनाकडेच बोट दाखवले जाते. त्यामुळे आज पालिकेच्या आरोग्य विभागाने पोलिस कर्मचाऱ्यांना सोबत घेत शहरात ठिकठिकाणी बसणाऱ्या महिला विक्रेत्या तसेच परप्रांतीय विक्रेत्यांना चांगलेच खडे बोल सुनावत कारवाई हाती घेतली.

यावेळी अनेकांना आवश्यक त्या सूचनाही आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या. बऱ्याच महिला या शहरातील ठराविक व्यापाऱ्यांच्या दुकानांसमोर व्यवसायासाठी बसतात. संबंधित दुकानदारांनाही तशा प्रकारच्या सूचना आरोग्य विभागाक़डून करण्यात आल्या. आवश्यक मार्ग सोडून व्यवसाय करण्यास कोणतीही हरकत नाही; मात्र वाहतूक कोंडी होईल, अशाप्रकारे रस्त्यावर आढळल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात आले.

शहरात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. पोलिस प्रशासन आणि पालिकेच्या माध्यमातून ही मोहीम राबवण्यात आली. यात यापुढेही सातत्य ठेवण्यात येणार आहे. जेणेकरून शहरातील वाहतूक सुरळीत होईल. बऱ्याच महिला विक्रेत्यांना या मोहिमेतून आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांनी त्यामध्ये सातत्य ठेवावे; अन्यथा दंडात्मक कारवाई हाती घेण्यात येईल.

- पांडुरंग नाटेकर, आरोग्य विभाग

Web Title: Sindhudurg Transport Municipal Police Traffic Road

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..