सिंधुदुर्ग : वेंगुर्लेत ‘पवनपुत्र’ भाजी मंडई गजबजली

शहरवासीयांना मिळाला दिलासा; आठवडा बाजारही होणार पूर्ववत
भाजी मंडई
भाजी मंडईsakal

वेंगुर्ले: गेले अनेक दिवस चर्चेत असलेली शहरातील ‘पवनपुत्र’ भाजी मंडई खऱ्या अर्थाने जनतेच्या सेवेसाठी सुरू झाली. व्यापाऱ्यांसह नागरिकांनीही याबाबत समाधान व्यक्त केले. दरम्यान, रविवारपासून शहरातील जुन्या बाजाराच्या ठिकाणीच आठवडा बाजार भरविण्यात येणार आहे. व्यापाऱ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे यांच्या सूचनेनुसार कार्यालयीन अधीक्षक संगीता कुबल यांनी केले आहे.

सुमारे एक वर्षाच्या कालावधीनंतर याठिकाणी हे भाजी मार्केट पूर्ववत सुरू झाले आहे. ‘पवनपुत्र’ भाजी मंडईचे नव्याने काम केले आहे. येथून स्थलांतरित झालेले भाजी व्यापारी, विक्रेते व किरकोळ रस्त्यावरील विक्रेत्यांना या नव्या जागेत अंगारकी संकष्टीनिमित्त आज पुन्हा बसविण्यात आले. नगरपरिषद प्रशासनाने या मंडईमध्ये १०० जागा आखल्या असून, त्या ठिकाणी या व्यापाऱ्यांनी बसून व्यापार करायचा आहे. मंगळवारी पहिल्या दिवशी शिस्तबद्धरित्या बाजार भरल्याने बाजाराला एक वेगळे रूप आले होते. रोज सकाळी सहा ते रात्री आठ या मुदतीत ही भाजी मंडई सुरू राहणार आहे. नगरपरिषदेच्यावतीने स्वच्छता राखण्याच्या दृष्टीने हे मार्केट रोज पाण्याने धुऊन स्वच्छ करण्यात येणार आहे.

वाहतूक कोंडीची समस्या सुटणार

एप्रिल, मे महिना आंबा, काजू, कोकम, फणस व अन्य फळांचा हंगाम आहे. मात्र, किरकोळ व्यापाऱ्यांना भाजी मार्केट बंद असल्याने उन्हात रस्त्याकडेला बसावे लागत होते. त्यामुळे वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत होता. आता भाजी मार्केट सुरू झाल्याने समस्या सुटणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com