esakal | सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागात कोरोनाचा शिरकाव
sakal

बोलून बातमी शोधा

sindhudurg zp office coronavirus infected one clerk and two sepoys from the education department in the Zilla Parishad

जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचारी चांगलेच अडचणीत आले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागात कोरोनाचा शिरकाव

sakal_logo
By
विनोद दळवी

ओरोस (सिंधुदुर्ग) : जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालया पाठोपाठ सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. जिल्हा परिषद मधील शिक्षण विभागातील एक लिपिक व दोन शिपाई अशा तीन कर्मचाऱ्यांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेत खळबळ माजली असून सोमवारी सकाळी शिक्षण विभाग कार्यालय बंद करण्यात आले.

शासन आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मध्ये ९ आणि १० ऑगस्ट रोजी शिक्षक बदली प्रक्रिया पार पडली. ९ रोजी झालेल्या बदली प्रक्रियेला सावंतवाडी आंबोली येथील एक प्राथमिक शिक्षक कोरोना चाचणी देवून उपस्थित राहिले होते. त्याच दिवशी रात्री त्यांचा अहवाल कोरोना बाधित आला होता. त्यामुळे बदली प्रक्रियेला उपस्थित असलेले शिक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ हेमंत वसेकर यांच्यासह अन्य उपस्थित अधिकाऱ्यांत खळबळ माजली होती. त्यानंतर 'त्या' शिक्षकाच्या अतिजोखमीच्या संपर्कात आलेल्या १९ व्यक्तीची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचे अहवाल आले असून यात तीन व्यक्ती कोरोना बाधित आल्या आहेत.

हेही वाचा- निलेश राणेंनी  संजय राऊतांना दिले हे आव्हान -


 जिल्हा परिषदेच्या पहिल्या मजल्यावर शिक्षण विभाग कार्यालय आहे. बाधित आलेल्यांत दोन शिपाई असल्याने त्यांचा संपर्क शिक्षण विभागातील अधिकारी-कर्मचारी यांच्यासह जिल्हा परिषद मधील अन्य विभागातील कर्मचारी यांच्याशी आला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचारी चांगलेच अडचणीत आले आहेत. खबरदारी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ वसेकर यांनी शिक्षण विभागाचे कार्यालयच बंद केले आहे. दरम्यान, दोन शिपाई आणि एक लिपिक बाधित आल्याने त्यांच्या संपर्कातील यादी वाढणार आहे. आरोग्य विभागाकडून संपर्कात आलेल्यांची यादी बनविन्याचे काम सुरु आहे. यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.

संपादन - अर्चना बनगे

loading image
go to top