राणेंचा भाजपकडून वारंवार होणार अपमान वेदनादायी - हुसेन दलवाई

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 ऑक्टोबर 2017

सावंतवाडी - माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा पक्षात असताना  काँग्रेसने नेहमीच सन्मान केला, मात्र आता ते भाजपच्या दारात उभे आहेत. वारंवार भाजपकडून त्यांचा अपमान सुरू आहे. हा सर्व प्रकार वेदना देणारा आहे, अशी खंत काँग्रेसचे नेते तथा खासदार हुसेन दलवाई यांनी आज येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केली

सावंतवाडी - माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा पक्षात असताना  काँग्रेसने नेहमीच सन्मान केला, मात्र आता ते भाजपच्या दारात उभे आहेत. वारंवार भाजपकडून त्यांचा अपमान सुरू आहे. हा सर्व प्रकार वेदना देणारा आहे, अशी खंत काँग्रेसचे नेते तथा खासदार हुसेन दलवाई यांनी आज येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केली

दरम्यान राणेंकडे मुख्यमंत्रीपद असताना सुध्दा त्यांना कोकणचा विकास  करायला जमला नाही. त्यामुळे ते भाजपात जाऊन काय साधणार असा प्रश्न सुध्दा दलवाई यांनी यावेळी उपस्थित केला येथील आरपीडी हायस्कूलच्या सभागृहात आज सायंकाळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. गोव्याचे प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक, जिल्हाध्यक्ष विकास सावंत, राजू मसुरकर, नगरसेवक जयेंद्र परुळेकर, साईनाथ चव्हाण आदी उपस्थित होते.

खासदार दलवाई म्हणाले, मी आजही नारायण राणेंना मानतो. ते काँग्रेसमध्ये राहावेत यासाठी आपण पर्यंत केलं होते. काँग्रेसमध्ये त्यांनी सातत्याने मंत्रीपद भोगले. अनेक वेळा त्यांनी पक्षश्रेष्ठींनीवर आपल्या स्वभाव प्रमाणे संतप्त व्यक्त केला. दोन वेळा विधानसभेत पडूनही त्यांना पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी विधान परिषदेवर आमदारकी दिली. असे असतानाही त्यांनी काँग्रेसविरोधात बंड करून पक्ष काढला. ते आज भाजपच्या दरवाजात उभे आहेत, मात्र भाजप त्यांना पक्षात न घेता एखाद्या कार्यकर्त्याप्रमाणे काँग्रेस शिवसेनेवर टीका करण्यासाठी वापर करीत आहेत.

श्री राणे हे आमचे आजही नेते आहेत, त्याचा होत असलेला अपमान आमच्यासाठी त्रासदायक आहे. ते ज्या संघटनेत जाण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या संघटनेत जातीय व्यवस्थेचे समर्थन, महिलांचा अपमान असे प्रकार चालतात. त्यामुळे राणे त्या ठिकाणी गेल्यानंतर कोणाचे नाव घेणार, कोणाला आदर्श मानतील असा सवालही दलवाई यांनी यावेळी केला.

राणेंनी आता  आत्मचिंतन करावे सातत्याने दहशत निर्माण करून राजकारण केले जात नाही. त्यांच्या अशा या स्वभावामुळे मुंबईत झालेल्या निवडणुकीत कोकणी माणसाने त्यांना मतदान केले नाही, ही वस्तुस्थिती आहे. मुख्यमंत्रीपद असतानासुद्धा राणेंना कोकणचा विकास करणे जमले नाही. एखादा सुध्दा उद्योग प्रकल्प त्यांनी आणला नाही, महामार्गाचा प्रश्न सोडण्यास त्यांना जमला नाही. त्यामुळे भाजपमध्ये जाऊन आणि आता राणे काय करणार असा प्रश्नही  दलवाई यांनी उपस्थित केला.

Web Title: sindhurdurg news Husain Dalwai press