सिधुदुर्गात विनोद कांबळी क्रिकेट अकादमी

कृष्णकांत साळगांवकर
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

कणकवली - आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून विनोद कांबळी सिधुदुर्ग ग्रामीण क्रिकेट अकादमी साकारली आहे. आज या अकादमीचे उद्घाटन माजी खासदार नीलेश राणे व क्रिकेटपट्टू विनोद कांबळी यांच्या हस्ते झाले.

कणकवली - आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून विनोद कांबळी सिधुदुर्ग ग्रामीण क्रिकेट अकादमी साकारली आहे. आज या अकादमीचे उद्घाटन माजी खासदार नीलेश राणे व क्रिकेटपट्टू विनोद कांबळी यांच्या हस्ते झाले.

कणकवली कलमट येथे चार एकरमध्ये अद्यावत क्रिकेटची खेळपट्टी आणि मैदान पीच क्यूरेटर नदीम मेमन यांच्या देखरेखी खाली तयार करण्यात आली आहे. ही जिल्ह्यातील पहिलीच अद्यावत अशी क्रिकेट अकादमी कणकवलीत सूरू होत आहे. 16 व 19 वर्षा खालील युवा क्रिकेटपटूंना येथे  प्रशिक्षण मिळणार आहे. 

ही अकादमी सुरु केल्यानंतर अनेकांनी मला विचारले, विनोद तू ग्रामीण भागात काय करणार आहेस? तर आपण त्यांना सांगतो की, मी ह्या अकादमीतून सचिन तेंडूलकर आणि विनोद कांबळी तयार करणार आहे. 

- विनोद कांबळी

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर व कपिल देव सुद्धा या क्रिकेट अकादमीला भेट देणार आहेत. आय. पी. एल सामने संपल्यानंतर सचिन तेंडूलकर ह्या क्रिकेट अकादमीला भेट देतील. असे क्रिकेटपट्टू विनोद कांबळी यांनी सांगितले. 

Web Title: Sindudurg News Vinod Kambli Cricket Akadami in Kalmath