सिंधुदुर्गच्या विकासाला मोपामुळे गती ः प्रमोद सावंत 

sindus Fisheries Festival Inauguration sawantwadi konkan sindhudurg
sindus Fisheries Festival Inauguration sawantwadi konkan sindhudurg

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - गोव्यातील मोपा विमानतळ 2022 मध्ये पूर्ण होणार आहे. त्यामुळे गोव्यासह सिंधुदुर्गाच्या पर्यटनाला विकासात्मक गती मिळणार आहे, असा विश्‍वास गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज येथे व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत योजनेतून नक्कीच सिंधुदुर्गात निलक्रांती घडेल, असेही ते म्हणाले. 

सिंधु आत्मनिर्भर अभियान सिंधु मत्स्य महोत्सवाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री विनोद तावडे, आत्मनिर्भर अभियान संयोजक अतुल काळसेकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, नगराध्यक्ष संजू परब, प्रदेश सचिव शरद चव्हाण, नीलक्रांती संस्था अध्यक्ष रविकिरण तोरसकर, अजय गोंदावळे, सभापती सौ. मानसी धुरी, सुधीर आडीवरडेकर, राजू बेग, प्रभाकर सावंत, राजू राऊळ, मोहिनी मडगावकर, दीपाली भालेकर, आनंद नेवगी, डॉ. प्रसाद देवधर, जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष भाई सावंत, अँड परिमल नाईक, उदय नाईक, केतन आजगावकर, बंटी पुरोहित, प्रमोद कामत, श्‍वेता कोरगावकर उपस्थित होते. 

सिंधु आत्मनिर्भर अभियान निलक्रांती कृषी मस्य पर्यटन संस्था आणि येथील नगरपालिका संयोजक आहेत. श्री. सावंत म्हणाले, ""केंद्र सरकारने विविध योजनातून 20 हजार कोटींचा निधी दिली आहे. नरेंद्र मोदींनी जगाला या देशाची ताकद दाखवून दिली आहे. केंद्र सरकारच्या योजना कार्यरत आहेत; मात्र राज्य सरकारला त्या माहीतच नसतात. असे असले तरी भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्या अंत्योदय घटकापर्यंत पोहोचविल्या पाहिजेत. गोव्याच्या धर्तीवर सिंधुदुर्गातही योजना पोहोचवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.'' 

ते म्हणाले, ""काही राज्यातील सरकारला मोदींच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यात अडचण निर्माण होत आहे; मात्र अतुल काळसेकर यांनी सिंधू आत्मनिर्भर योजनेतून निलक्रांती घडविण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. गोव्यात पर्यटनावर आधारित व्यवसाय असला तरी साडेचार लाख लिटर दूध लागते. भाजी कर्नाटक व महाराष्ट्रातून येते. दीड लाख अंडी गोव्यासाठी लागतात.

सिंधुदुर्गमध्ये इंडस्ट्री व्यवसाय पण कठीण आहे; मात्र या ठिकाणी स्थानिक रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. जिल्ह्यामध्ये हरितक्रांती सह निलक्रांती होणे गरजेचे आहे, हा विचार मोदींनी व्यतिरिक्त कोणीही केला नव्हता मात्र आत्मनिर्भर योजनेतून या विचाराला आता नवीन दिशा मिळायला हवी. निलक्रांतीवर अभ्यास व भविष्याच्या दृष्टीने विकासासाठी गोवा राज्यात असलेल्या विविध राष्ट्रीय संस्थांचा उपयोग जिल्ह्यातिल युवकांनी करून घ्यायला हवा. त्यासाठी मी नक्की सहकार्य करेन.'' 

संयोजक अतुल काळसेकर म्हणाले, ""योजना लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पुढाकार घेतला आहे.'' निलक्रांत संस्था अध्यक्ष रविकिरण तोरसकर यांनी माहिती दिली. यावेळी भगीरथ प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर यांनी मासे,भात, हळद उत्पादनात कोकणाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी फायदा होईल, असे स्पष्ट केले. 

माजी मंत्री विनोद तावडे म्हणाले, ""आत्मनिर्भर शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. तो यशस्वी करण्यासाठी सिंधु आत्मनिर्भर अभियान यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले जात आहेत. जिल्ह्यात दहा मोठी धरणे, मध्यम धरणाच्या पाण्यात गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धन करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. जिल्ह्यातील लोकांना लागणाऱ्या सर्व उपयुक्त उत्पादन जिल्ह्यात निर्माण झाले तर मनिऑडर कोकणातून बाहेर पाठवीता येईल, एवढी ताकद आत्मनिर्भर आणि निलक्रांतीमध्ये आहे.'' भोसले नॉलेज सिटी कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले आणि नगराध्यक्ष संजू परब यांचा सत्कार डॉ. प्रमोद सावंत आणि विनोद तावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

सिंधुदुर्गवासीयांचे बलिदान विसरणार नाही 
गोवा 1961 ला स्वतंत्र झाला; परंतु त्या आधी गोवा स्वतंत्र करण्यासाठी सिंधुदुर्ग सीमेवरील पत्रादेवी येथे जिल्ह्यातील अनेक नागरिक निघाले होते. त्यातील अनेकांनी बलिदान दिले आहे. गोवा स्वतंत्र करण्यात सिंधुदुर्गवासियांचे बलिदान मी कधीही विसरू शकणार नाही. मी त्यांचा ऋणी आहे, अशी भावनात्मक प्रतिक्रिया श्री. सावंत यांनी व्यक्त केली. 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com