सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रीत वाढले सहा कोरोना पाॅझिटिव्ह

corona
corona

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले दोन दिवस रुग्ण आढळत नव्हेतच पण काही बाधित कोरोनामुक्त होवून घरी जात होते. त्यामुळे जिल्ह्यासाठी मोठे आशादायक चित्र निर्माण झाले होते. याला मंगळवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालामुळे तडा बसला. 

मंगळवारी रात्री  उशिरा एकूण 66 अहवाल आले. त्यातील सहा पाॅझिटिव्ह होते तर 46 निगेटिव्ह होते. एकूण 11 अहवाल फेरतपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. दरम्यान,  जिल्ह्यातील आणखी तीन रुग्णांनी मंगळवारी कोरोनावर मात केली. त्यांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनावर मात केलेल्यांची संख्या 224 झाली आहे. परिणामी जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या 34 राहिली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली. 

दिवसभरात जिल्हा कोरोना तपासणी केंद्राला नव्याने 56 तपासणी नमुने आले, तेंव्हा नमुन्यांची संख्या चार हजार 476 झाली. यातील चार हजार 400 नमुन्यांचे अहवाल आले. त्यातील चार हजार 142 अहवाल निगेटिव्ह आहेत. बाधित पैकी 224 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. पाच व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. 

आयसोलेशन कक्षात सध्या 46 रुग्ण उपचार घेत आहेत. यातील डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल असलेल्या जिल्हा रुग्णालयात 14 बाधित आणि 18 संशयित आहेत. डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर व कोविड केअर सेंटरमध्ये प्रत्येकी सात बाधित आहेत. आरोग्य पथकाकडून मंगळवारी चार हजार 662 जणांची तपासणी झाली. यातील कोणालाही कोरोनाचे लक्षण आढळले नाही. 

संस्थात्मक क्वारंटाईनमधील 618 व्यक्ती घरी

जिल्ह्यातील संस्थात्मक क्वारंटाईनमधील 618 व्यक्ती घरी गेल्याने येथे 12 हजार 831 व्यक्ती आहेत. शासकीय संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये दोन व्यक्ती वाढल्याने येथील संख्या 47 झाली. गाव पातळीवरील संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये 657 व्यक्ती घरी परतल्याने येथे आता 10 हजार 76 व्यक्ती आहेत. नागरी क्षेत्रातील संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये 37 व्यक्ती वाढल्या. तेथील संख्या दोन हजार 708 झाली आहे. जिल्ह्यात नव्याने एक हजार 500 व्यक्ती दाखल झाल्या. त्यामुळे दोन मेपासून दाखल होणाऱ्यांची संख्या एक लाख 32 हजार 458 झाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com