खालापुरातील वणव्यात सहा बकऱ्यांचा बळी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

खोपोली - घोडीवलीवाडीच्या पश्‍चिमेस डोंगरावर लावलेल्या आगीचे वणव्यात रूपांतर होऊन तेथे चरणाऱ्या सहा बकऱ्या होरपळून मृत्यू पावल्या. याशिवाय सात बकऱ्या भाजून जखमी झाल्या आहेत.

खोपोली - घोडीवलीवाडीच्या पश्‍चिमेस डोंगरावर लावलेल्या आगीचे वणव्यात रूपांतर होऊन तेथे चरणाऱ्या सहा बकऱ्या होरपळून मृत्यू पावल्या. याशिवाय सात बकऱ्या भाजून जखमी झाल्या आहेत.

सकाळी चरायला गेलेल्या या बकऱ्या परत आणण्यासाठी आदिवासी महिला दुपारी गेल्या असता त्यांना हा वणवा दिसला. यात बकऱ्या अडकल्याची माहिती त्यांनी गावात कळविताच गावकऱ्यांनी तिकडे धाव घेतली. वणवा विझवून बकऱ्या वाचविण्याचा प्रयत्न केला. या वाडीतील ताराबाई शांताराम वाघमारे व कमल सुरेश वाघमारे यांच्या 23 बकऱ्या होत्या. यातील ताराबाईंच्या पाच, तर कमल यांची एक बकरी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. तलाठी भालेराव यांनी घटनास्थळी पंचनामा करून वरिष्ठांना अहवाल दिला आहे. पंचायत समिती सदस्य निवृत्ती पिंगळे, नावंढेचे सरपंच शिवाजी पिंगळे, उपसरपंच चंद्रकांत खंडागळे, सदस्य रोहिदास पिंगळे, ग्रामसेवक घोगाडे बाई, सामाजिक कार्यकर्ते शेखर पिंगळे यांनी घटनास्थळी जाऊन आदिवासींना धीर दिला.

भरपाईसाठी प्रयत्न
या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही; मात्र आदिवासींच्या बकऱ्या जळून झालेल्या नुकसानीची तातडीने भरपाई देण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती पंचायत समितीचे सदस्य निवृत्ती पिंगळे, सरपंच शिवाजी पिंगळे यांनी दिली आहे.

Web Title: Six goats died

टॅग्स