काजू बी, सुपारीला सहा टक्के दराने कर्ज

काजू बी, सुपारीला  सहा टक्के दराने कर्ज

रत्नागिरी - कृषी उत्पन्न बाजार समिती व राज्य कृषी पणन मंडळातर्फे शेतमाल तारण कर्ज योजना राबवण्यात येत आहे. यामार्फत काजू बी आणि सुपारीला प्रचलित दराच्या ७५ टक्के किंवा १०० रुपये किलोप्रमाणे सहा टक्के व्याजदराने कर्ज मिळणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती दत्तात्रय ढवळे यांनी येथे दिली.

शेतकऱ्याला असलेल्या आर्थिक गरजेपोटी तसेच स्थानिक पातळीवर शेतमाल साठवणुकीच्या पुरेशा सुविधा नसल्यामुळे सुगीच्या कालावधीत शेतीमाल एकाच वेळी मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणला जातो. त्यामुळे या कालावधीत शेतमालाचे बाजारभाव कमी होतात. शेतमालास योग्य बाजारभाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. मात्र काढणी हंगामात शेतमालाची साठवणूक करून तो काही कालावधीनंतर बाजारपेठेत विक्रीस आणल्यास त्या शेतमालास जादा बाजारभाव मिळू शकतो. शेतकऱ्यांना सुगीच्या कालावधीत असलेली आर्थिक निकड विचारात घेऊन त्यांना या गरजेवेळी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी राज्य कृषी पणन 
मंडळ शेतमाल तारण कर्ज योजना राबवित आहे. 

या योजनेमध्ये काजू बी व सुपारीचा समावेश आहे. योजनेंतर्गत शेतकऱ्यांना बाजार समितीच्या गोदामात तारणात ठेवलेल्या शेतमालाच्या एकूण किमतीच्या ७५ टक्के किंवा प्रतिकिलो १०० रुपयांपर्यंत सहा महिने कालावधीसाठी सहा टक्के व्याजदराने तारण कर्ज देण्यात येणार असल्याचे ढवळे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com