जमिनदलालांनी घातला साठ लाख गंडा

सुनील पाटकर
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

महाड : महाड तालुक्यातील रेवतळे गावात शेतजमिन खरेदी करुन देण्याचे आमिष दाखवून पुणे येथील एका सेवानिवृत्ताला सुमारे साठ लाख रुपयाचा गंडा घालणाऱ्या महाड मधील तीन जमिनदलालांना शहर पोलीसांनी अटक केली आहे. यातील रविकांत वैराळे हा भाजप महाड तालुका सरचिटणीस आहे .

याबाबत पाषाण-पुणे येथे राहणारे श्रीकांत खेडगीकर यांनी काल या बाबत तक्रार दाखल केली होती. खेडगीकर यांना रेवतळे गावाच्या हद्दीतील 7.20 हेक्टर शेतजमीन खरेदी करून देण्याचे आमिष रविकांत वैराळे, मुबीन चोधरी (रा.महाड) व अनुरथ साळवी (रा.रेवतळे) दाखवून त्यांच्याकडून बँक व्यवहाराने 59 लाख 50 हजार रुपये इतकी रक्कम घेतली. परंतु, दुय्यम निबंधक कार्यालयात केवळ बनावट अखत्यार पत्र व ढोबळ साठेखत करुन जमिनी खरेदीखताद्वारे.

खेडगीकर यांच्या नावे करून न देता संपूर्ण रक्कम या तिघांनी हडप केली. 14 ऑक्टोबर 2013 ते 16 फेब्रुवारी 2016 या कालावधीत हा प्रकार घडला अखेर या प्रकरणी तिघांवर फसवणूक, अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. यातील रविकांत वैराळे हा भाजप महाड तालुका सरचिटणीस आहेत. या बाबत आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक एम.एस.पाटिल अधिक तपास करत आहेत.

Web Title: Sixty lakh fraud for land broker