चिपळूण : झाडांना झोपाळे, पक्ष्यांसाठी खोपे, निसर्ग सानिध्यात ताजेतवाने

रेडरूफ कृषी पर्यटन केंद्र; पारखा झालेला आनंद मिळवण्यावर भर
agri tourism
agri tourismsakal

चिपळूण : उन्हाळ्यात थंडावा मिळावा, या हेतूने आंब्याच्या झाडाखाली एकावेळी दहा माणसं बसून गप्पा मारतील, अशी आकर्षक बैठक व्यवस्था, शहरी संस्कृतीतील बहुतांश पर्यटकांना मोकळं हवेशीर राहण्याची हौस असते. ही हौस या केंद्रावर पूर्ण होते. झाडांना झोपाळे, झोके, पक्ष्यांसाठी खोपे व पाण्याची व्यवस्था खेळाचा आनंद घेण्यासाठी ग्रामीण खेळांचे साहित्य अशा छोट्या, छोट्या पण सध्याच्या काळात शहरी माणूस पारखा झालेल्या गोष्टींचा आनंद पर्यटकांना द्यायचा, अशी खासियत आहे, रेडरूफ कृषी पर्यटन केंद्राची.

२२ जुलैच्या महापुरात पिंपळीतील रेडरूफ कृषी पर्यटन केंद्र पूर्णपणे उद्‌ध्वस्त झाले होते. हे कृषी पर्यटन केंद्र पुन्हा एकदा देश - विदेशातील पर्यटकांच्या सेवेत रूजू झाले आहे. येथे भोजनात मागणीप्रमाणे आवडीचे जेवण दिले जाते. भाजी, सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या भाज्याही तत्काळ बनवून देण्याची सोय येथे उपलब्ध आहे. मडक्‍यात पारंपरिक पद्धतीने बनवलेले ताक यामुळे भोजनव्यवस्था पर्यटकांच्या पसंतीस उतरली आहे.

कृषिमित्र आणि सेंद्रिय शेतीची आवड असणारे अनिल साळुंखे यांनी शहरापासून १२ किलोमीटर अंतरावर पिंपळी येथे शेती परिसर व निसर्गाचा लाभ उठवीत कृषी पर्यटन केंद्र सुरू केले. रेडरूफ फार्म हाऊस नावाने ते ओळखले जाते. येथे राहण्याची उत्तम सोय आहे. सुट्टीच्या दिवशी निसर्गात राहून पुन्हा ताजेतवाने होऊन शहराकडे परतण्याचा आनंद पर्यटक घेतात.

एक नजर..

  • शहरापासून १२ किलोमीटर अंतरावर पिंपळी येथे केंद्र

  • घरगुती पद्धतीने चुलीवरचे जेवण केले जाते तयार

  • २ एकर क्षेत्रावर नारळी, पोफळीच्या बागेत राहण्याची सोय

  • पर्यटन केंद्रावर विविध प्रकारच्या आंब्याची झाडे

  • येथील हापूसची चव पर्यटकांना आकर्षित करते

महापुरात कृषी पर्यटन केंद्राचे छप्पर वगळता काहीच शिल्लक राहिले नव्हते. सरकारकडून काही मदत मिळाली नाही. मागील पाच वर्षांत येथे राहण्यासाठी आलेल्यांनी चौकशी सुरू केली. त्यामुळे निव्वळ त्यांच्या आग्रहासाठी मी हे केंद्र पुन्हा सुरू केले आहे.

- अनिल साळुंखे, संचालक, रेडरूफ कृषी पर्यटन केंद्र, पिंपळी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com