मुंबई-गोवा महामार्गावर सुकेळी खिंडीत चार वाहने बंद; वाहतुकीवर परिणाम

अमित गवळे
बुधवार, 18 जुलै 2018

पाली : मुंबई-गोवा महामार्गावर सुकेळी खिंडीत बुधवारी (ता.१८) काही अंतरावर सलग चार अवजड वाहने रस्त्यात बंद पडली होती. यामुळे वाहतुकीस अडथळा येऊन वाहतूक संथ गतीने सुरु होती

सुकेळी गावाकडून पुढे कोलाडकडे जातांना चढणीवर ही अवजड वाहने बंद पडली होती. याच मार्गावर गेल्या गुरुवारी (ता.१२) एक कंटेनर बंद पडला होता. सुकेळे खिंडीत वारंवार अवजड वाहने बंद पडतात.

अनेकदा भरधाव अवजड वाहने रस्त्याच्या खाली दरीत किंवा खड्यात कोसळून अपघातही होतात. सुकेळी खिंडीत अाता भले मोठे खड्डे पडले अाहेत. तसेच येथे दरड कोसळण्याचा धोकादेखील आहे. सुरक्षेच्या दृष्टीने येथे कोणतीच उपाययोजना केली गेलेली नाही. त्यामुळे येथे सातत्याने वाहतूक कोंडी होत असते .त्यामुळे या मार्गावरुन वाहतूक करणे अत्यंत धोकदायक व जिकरीचे झाले आहे.

Web Title: Slow moving traffic on Mumbai Goa Highway