
Snehal Jagtap: स्नेहल जगताप यांचा कुटुंबियांसह ठाकरे गटात प्रवेश; मिळाली महत्वाची जबाबदारी
महाड : महाडच्या नगराध्यक्षा आणि काँग्रेस नेत्या स्नेहल जगताप यांनी आज शिवसेनेच्या ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या महाड येथील सभेदरम्यान उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला. यावेळी त्यांच्यावर ठाकरे गटाकडून एक महत्वाची जबाबदारी देखील सोपवण्यात आली. (Snehal Jagtap joins Shivsena Thackeray faction with family)
ठाकरे गटाचे वरिष्ठ नेते अनंत गिते यांनी स्नेहल जगताप यांचा परिचय करुन देताना त्यांचा पक्ष प्रवेश झाल्याचं जाहीर केलं. तसेच महाडचं नेतृत्व त्यांच्याकडे सोपवण्यात येत असल्याचंही यावेळी गिते यांनी सांगितलं.
दरम्यान, स्नेहल जगताप बोलताना म्हणाल्या, "माझ्या कुटुंबियांसह आणि हितचिंतकांसह आम्ही ठाकरे गटात प्रवेश करत आहोत. आज या सभेच्या निमित्तानं सांगते की या मतदारसंघात केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे याच पक्षाचा आमदार निवडून येईल. या मतदारसंघातील जनतेनं आता ठरवलं आहे. या शहरानं मला नगराध्यक्ष म्हणून संधी दिली. निवडणुकांदरम्यान दिलेल्या आश्वासानानुसार मी ९० टक्के कामकाज पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे"