सावधान ! "सोबा' चा धोका 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

ऑक्‍टोबरच्या शेवटच्या आठवड्यात सिंधुदुर्गच्या किनारपट्टीला "क्‍यार' चक्रीवादळाचा तडाखा बसला होता. यात भातशेतीची अपरिमित हानी झाली होती. मच्छीमार आणि पर्यटक, व्यावसायिकांना मोठा फटका बसला. त्यानंतर आता पुढील बारा तासांत "सोबा' चक्रीवादळाचे संकट किनारपट्टीवर आहे.

कणकवली ( सिंधुदुर्ग ) - भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार नैऋत्य अरबी समुद्र आणि विषुववृत्तीय हिंदी महासागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याचे रूपांतर पुढील 12 ते 48 तासांमध्ये "सोबा' या चक्रीवादळात होण्याची शक्‍यता आहे. या वादळाचा सिंधुदुर्ग किनारपट्टीलाही धोका असून ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्‍यता आहे. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्‍त केला आहे. 

हेही वाचा - नाणार संदर्भात मुख्यमंत्र्यांनी केली ही घोषणा 

ऑक्‍टोबरच्या शेवटच्या आठवड्यात सिंधुदुर्गच्या किनारपट्टीला "क्‍यार' चक्रीवादळाचा तडाखा बसला होता. यात भातशेतीची अपरिमित हानी झाली होती. मच्छीमार आणि पर्यटक, व्यावसायिकांना मोठा फटका बसला. त्यानंतर आता पुढील बारा तासांत "सोबा' चक्रीवादळाचे संकट किनारपट्टीवर आहे. सिंधुदुर्गात गेले दोन दिवस ढगाळ वातावरण आहे. जिल्ह्यात तुरळक सरीदेखील पडत आहेत. याखेरीज वाऱ्याचा वेगदेखील वाढला आहे. त्या अनुषंगाने भारतीय हवामान विभागाने आज सकाळी 11 वाजता चक्रीवादळाचे पूर्वानुमान व्यक्‍त केले आहे. यात अरबी समुद्राच्या आग्नेय व मध्यपूर्व भागात तसेच लक्षद्वीप भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. पुढील 24 तासांत तीव्र कमी दाब क्षेत्राचे रूपांतर चक्रीवादळात होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पुढील 48 तासांत दक्षिण कोकण आणि गोवा राज्यामध्ये तुरळक ठिकाणी हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या पर्जन्यवृष्टीची शक्‍यता असून वारे ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वाहण्याची शक्‍यता आहे. 

हेही वाचा - लोकमान्य टिळकांचे जन्मस्थळ विकसित कधी होणार ? 

"सोबा' चक्रीवादळ येत असल्याने वातावरणात बदल

ऑक्‍टोबरअखेरीस आलेल्या "क्‍यार' चक्रीवादळामुळे भातपिकाची मोठी हानी झाली. चक्रीवादळानंतर अवकाळी पावसाचा आंबा, काजू बागायतदारांनाही फटका बसला. गेले काही दिवस गुलाबी थंडी असताना आता पुन्हा "सोबा' चक्रीवादळ येत असल्याने वातावरणात बदल झाला आहे. रात्रीची थंडी गायब झाली असून दोन दिवस ढगाळ वातावरण आहे. उष्मादेखील कमालीचा वाढला आहे. त्याचा फटका आंबा, काजू बागायतदारांनाही बसण्याची शक्‍यता व्यक्‍त होत आहे. कोकण

कमी दाब क्षेत्राचे रूपांतर चक्रीवादळात

""अरबी समुद्राच्या आग्नेय व मध्यपूर्व भागात आणि लक्षद्वीप भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. पुढील 24 तासांत तीव्र कमी दाब क्षेत्राचे रूपांतर चक्रीवादळात होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पुढील 48 तासांत सिंधुदुर्ग आणि गोव्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो.'' 
- डॉ. व्ही. जी. मोरे, हवामान शास्त्रज्ञ, कोकण कृषी विद्यापीठ- दापोली.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Soba Cyclone In Sindhudurg Be Alert