शाळेच्या बोलक्‍या भिंती अन्‌ वाढदिवसाची बाग!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 एप्रिल 2017

राजापूर - गेल्या काही वर्षांमध्ये तापमानामध्ये झालेली वाढ, हवामानात झालेल्या बदलाने सारेच हैराण झाले आहेत. मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही मार्च-एप्रिलमध्ये पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तालुक्‍यातील कळसवली येथील केंद्रशाळेच्या भिंती वृक्ष लागवड करा, पाणी वाचवा आणि बेटी बचावचा संदेश देत आहे. जिल्हा परिषदेचा आदर्श शाळा पुरस्कार मिळालेली आणि ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त असलेल्या या शाळेच्या भिंतीवरील समाजप्रबोधनात्मक चित्रे साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

विविध स्तरांतील शाळेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदशन करून खऱ्या अर्थाने घडविण्याचे काम सर्वच शाळांमध्ये केले जाते. पन्नास वर्षांपूर्वी गावातील तत्कालीन समाजधुरीणींनी इमारत बांधलेल्या या शाळेमध्ये गुणवत्ताधारक विद्यार्थी घडत आहेत. शिक्षकांकडून दर्जेदार विद्यादान केले जाते. विद्यार्थ्यांसह पालकांचेही चांगलेच सहकार्य मिळत आहे. त्यामुळे ही शाळा गुणवत्तेमध्ये अग्रसेर ठरली. या शाळेने गुणात्मक प्रगती साधलेली आहेच. त्याचवेळी शाळेने भिंतीचित्रांच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले.  ते साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या शाळेच्या इमारतीच्या भिंती, शाळेचे कंपाउंड वॉल यांची रंगरंगोटी करण्यात आली असून त्यावर ‘बेटी बचाव-बेटी पढाव’, ‘वृक्ष लागवड-वृक्ष संवर्धन’,‘ सेव्ह वॉटर’, ‘हमारा पर्यावरण’ आदी संदेश देणारे चित्रे काढण्यात आली आहेत. ओणी-शिवणे रस्त्यावर असलेल्या शाळेच्या या विविध सामाजिक संदेश देणाऱ्या भिंतींकडे साऱ्यांच्या माना वळत आहेत. या शाळेला भेटी देणाऱ्या अनेक मान्यवरांवनी समाज प्रबोधन करणाऱ्या या भिंतीचित्रांच्या संकल्पनेचे कौतुक केले आहे.

Web Title: Social awareness pictures on school wall