पाच लाख शेतकर्‍यांना मृद आरोग्य पत्रिका

राजेश कळंबटे
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

रत्नागिरी - माती परीक्षणानुसार खतांचे व्यवस्थापन केल्यास जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवण्यास, पिकांचे उत्पादन वाढण्यास व खर्चाच्या बचतीस मदत होते. हे लक्षात घेऊन जिल्ह्यात शेतकर्‍यांना दरवर्षी मृद् आरोग्य पत्रिका दिली जाते. मागील दोन वर्षात पाच लाख चौदा हजार शेतकर्‍यांना मृद पत्रिकांचे वाटप करण्यात आले आहे.

रत्नागिरी - माती परीक्षणानुसार खतांचे व्यवस्थापन केल्यास जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवण्यास, पिकांचे उत्पादन वाढण्यास व खर्चाच्या बचतीस मदत होते. हे लक्षात घेऊन जिल्ह्यात शेतकर्‍यांना दरवर्षी मृद् आरोग्य पत्रिका दिली जाते. मागील दोन वर्षात पाच लाख चौदा हजार शेतकर्‍यांना मृद पत्रिकांचे वाटप करण्यात आले आहे.

शेत मशागतीच्या चुकीच्या पद्धती, बेसुमार जंगलतोड, अनिर्बंध चराई, वारा, जोराचा पाऊस या कारणांमुळे जमिनीची धूप होते. हजारो वर्षांनी बनलेला हा मातीचा थर नष्ट व्हायला, अल्प कालावधीही पुरेसा ठरतो. भविष्यात जमीन आरोग्याचे निदान करण्यासाठी माती परीक्षण तंत्रज्ञानाचा वापर अपरिहार्य असून जमिनीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणाम दिसतील.

हे लक्षात घेऊन केंद्र व राज्य शासनाने मृद आरोग्य पत्रिका वितरण कार्यक्रम 2015-16 पासून राबविण्यास सुरवात केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 2015-16 पासून मृद् आरोग्य पत्रिका अभियान राबविले जात आहे. त्यात बागायत क्षेत्रातून 2.5 हेक्टरला 1 प्रातिनिधिक मृद नमुना व जिरायत क्षेत्रातुन 10 हेक्टरला 1 प्रातिनिधिक नमुना घेतला जातो. त्या परिघक्षेत्रात सामाविष्ट सर्व शेतकर्‍यांना मृद आरोग्य पत्रिका देण्यात येते. दोन वर्षात सर्व गावांची निवड करून सर्व शेतकर्‍यांना त्यांच्या जमिनीची आरोग्य पत्रिका देण्यात येत आहे. मृद आरोग्य पत्रिकेत जमिनीतील उपलब्ध अन्न द्रव्यांचे प्रमाण समजेल. त्याचा उपयोग शेतकर्‍यांना विविध पिकांना योग्य प्रमाणात संतुलित खते देण्यासाठी होणार आहे.

पोमेंडीत कार्यक्रम

मृदा दिनाच्या निमित्ताने बुधवारी (ता. 5) पोमेंडी येथील जिल्हा मध्यवर्ती रोपवाटिका येथे सकाळी 10.30 वाजता कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तेथे शेतकर्‍यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा मृद सर्वेक्षण अधिकारी स्मिता धावडे यांनी केले.

वर्ष       गावे     मृद नमुने      मृद आरोग्य पत्रिका शेतकरी

* 2015-16     1546   55,325      3 लाख 89 हजार  259

* 2017-18       779   17,588      1 लाख 25 हजार 445

* 2018-19       767   14,556            कार्यवाही सुरू

Web Title: soil testing table given to 5 lakh farmers