हर्डीतील घनकचरा प्रकल्प हटवा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 एप्रिल 2017

राजापूर - शहरानजीकच्या हर्डी येथील पालिकेच्या घनकचरा प्रकल्पाचा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. विविध प्रकारच्या प्रदूषणामुळे या परिसराला धोका निर्माण करणारा हर्डी येथील हा घनकचरा प्रकल्प रद्द करणारा ठराव करावा, अशी मागणी हर्डी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे पंचायत समितीकडे केली आहे. पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी हर्डी येथून घनकचरा प्रकल्प हटविण्याच्या केलेल्या सूचनेला पालिकेने वाटाण्याच्या अक्षता लावल्या. त्यामुळे आमसभेमध्ये याबाबत कोणता निर्णय होणार याकडे लक्ष लागले आहे. 

शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेने हर्डी येथील जागा खरेदी करून प्रकल्पाची उभारणी केली. येथे डंपिंग केलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे गरजेचे असताना तो तसाच ठेवला जातो. त्यामुळे कचरा कुजून परिसरात दुर्गंधी पसरते. त्यामुळे हा प्रकल्प येथून हटवावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे; मात्र त्याकडे पालिकेने दुर्लक्ष केले. त्यातून पालिका आणि ग्रामस्थांमध्ये संघर्ष पेटला आहे. पालकमंत्री श्री. वायकर यांनी पालिकेला प्रकल्प तेथून हटविण्याची सूचना केली होती. वर्षभराचा कालावधी उलटला तरी पालिकेने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे पंचायत समितीच्या होणाऱ्या आमसभेच्या अनुषंगाने घनकचरा प्रकल्पाचा हा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. हर्डी येथील घनकचरा प्रकल्प रद्द करण्याचा ठराव करण्याची मागणी हर्डी ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.

Web Title: The solid waste plant in Hardi

टॅग्स