सोलिवडे गाव २७ वर्षांनंतर एकत्र

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 मार्च 2019

राजापूर - काही विषयावरून वादातून दोन गटात विभागले गेलेले तालुक्‍यातील सोलिवडे गाव तब्बल सत्तावीस वर्षांनंतर एकत्र आले. वाद मिटविण्यासाठी ग्रामस्थांनी नवनिर्माण ग्रामविकास मंडळ, मुंबई व श्री वावळदेवी जीर्णोद्धार समिती या गावच्या मंडळांचे साह्य घेतले. पाचशे वस्तीचे गाव एकत्र गुण्यागोविंदाने नांदणार आहे. यावर्षीपासून उत्सव, कार्यक्रम एकत्रित साजरे करणार आहेत. तालुक्‍याच्या पूर्व भागातील सात वाड्यांचे सोलिवडे गाव.

सुमारे सत्तावीस वर्षांपूर्वी गावामध्ये काही वाद होऊन त्यातून गावात दोन गट पडले होते. विविध उत्सव आणि कार्यक्रम हे दोन्ही गट स्वतंत्ररित्या साजरे करीत होते. तालुक्‍यातील अनेक गावांमध्ये गेल्या काही वर्षापासून वाद सुरू असून ते मिटविण्यासाठी त्या गावामधील ग्रामस्थ न्यायालयामध्ये खेटे मारीत असताना विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या सोलिवडे गावातील काही तरुणांसह ज्येष्ठांनी हा वाद मिटविण्याचा निर्धार केला. त्यासाठी नवनिर्माण ग्रामविकास मंडळ, व श्री वावळदेवी जीर्णोद्धार समितीच्या प्रयत्नांना गावकर गणपत राठवड, बाळ नाफडे, वासुदेव पाष्टे, संजय धावडे, जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष विष्णू पाष्टे, चंद्रकांत पाष्टे, सचिव संदेश मिठारी, नवनिर्माण ग्रामविकास मंडळ, मुंबईचे अध्यक्ष सचिन मिठारी, गणपत वाफेलकर आदींनी साथ दिली.दोन्ही गटांच्या एकत्रित नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये अनेक वर्षापासून असलेला वाद कायमस्वरूपी मिटवण्यात आला.  
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: solivade gaon unity after 27 years