समस्यांना वाचा फोडा - पद्मजा चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

कणकवली - संकटाला किंवा अत्याचाराला आत्महत्या हा पर्याय नाही, तर अन्यायाविरुद्ध लढा देणे, समस्यांना वाचा फोडणे यातूनच मार्ग निघे शकतो आणि न्याय मिळू शकतो, असे मत उपविभागीय पोलिस अधिकारी पद्मजा चव्हाण यांनी व्यक्त केले.

कणकवली - संकटाला किंवा अत्याचाराला आत्महत्या हा पर्याय नाही, तर अन्यायाविरुद्ध लढा देणे, समस्यांना वाचा फोडणे यातूनच मार्ग निघे शकतो आणि न्याय मिळू शकतो, असे मत उपविभागीय पोलिस अधिकारी पद्मजा चव्हाण यांनी व्यक्त केले.

कणकवली येथील भाजपच्या महिला आघाडीतर्फे येथील चौंडेश्‍वरी मंदिरात जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम झाला. यात उपविभागीय पोलिस अधिकारी पद्मजा चव्हाण बोलत होत्या. या वेळी सावंतवाडीच्या उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, नगरपंचायतीच्या विरोधी पक्षनेत्या राजश्री धुमाळे, डॉ. शामिता बिरमोळे, गीतांजली कामत, प्रज्ञा ढवण, प्राची कर्पे, कल्पना सावंत, डॉ. नाटेकर, मानसी वाळवे, डॉ. करंदीकर, सौ. बडे, डॉ. आपटे, डॉ. नायगावकर, जयश्री आडिवरेकर, सुरेखा भिसे, भाई परब आदी उपस्थित होते.

उपनगराध्यक्षा कोरगावकर म्हणाल्या, ‘‘कोणत्याही क्षेत्रात प्रगती करावयाची असल्यास कष्ट करावेच लागतात. आधुनिक युगात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. तरी आजही महिलांवरील अन्याय, अत्याचार संपलेले नाहीत, ही शोकांतिकाच आहे.’’
डॉ. शमिता बिरमोळे यांनी आर्थिक नियोजन, आरोग्याविषयी घ्यावयाची काळजी आणि नियमितपणे कराव्या लागणाऱ्या तपासण्या याबाबतचे मार्गदर्शन केले. कनकसिंधू महिला पथकाने ढोलवादन आणि ढोलनृत्य सादर केले. राजापूर येथील महाविद्यालयीन युवती स्नेहा व नम्रता रहाटे यांनी पारंपरिक युद्धकलेतील बाणाटी, लाठीकाठी आदींची प्रात्यक्षिके सादर केली. 
कार्यक्रमात शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या जयश्री कडुलकर, तनुजा बावकर, अनुराधा खामकर, मनीषा पाटकर, शंकराम्मा पुजारे, सविता तायशेटे, नयना वालावलकर, सविता परब, वैजयंती शेट्ये आदींचा विशेष सत्कार झाला.

Web Title: solution on problems