Photo : अखेर बुलबुलच्या तीन पिलांची आकाशात यशस्वी झेप

सचिन माळी
Monday, 2 November 2020

जुलै ते सप्टेंबर हा पक्ष्यांचा विणीचा काळ असतो; मात्र पक्ष्यांनी बनवलेली घरटी अनेक वेळा कोणत्या तरी घटनेची शिकार होतात.

मंडणगड (रत्नागिरी) : ग्रामीण भागात विविध पक्ष्यांचा विणीचा हंगाम सुरू आहे. घरट्यांतून पिलांचा जन्मोत्सव होत असून, त्यांच्या संगोपनासाठी पक्षी धावपळ करताना दिसत आहेत. जंगल परिसरातच नव्हे, तर घरांभोवती असणाऱ्या झाडांवर पक्ष्यांनी आपली घरटी बांधली आहेत. अशाच एका घरट्यातून बुलबुल पक्ष्याच्या तीन पिलांनी यशस्वी भरारी घेत आकाशाकडे झेप घेतली. 

जून ते ऑक्‍टोबर हा अनेक पक्ष्यांचा विणीचा काळ असतो. अनेक दुर्मिळ पक्ष्यांचे यावेळी दर्शन घडते. पावसाळ्यात अनेक पक्ष्यांची घरटी बांधण्याची लगबग सुरू होते. जुलै ते सप्टेंबर हा पक्ष्यांचा विणीचा काळ असतो; मात्र पक्ष्यांनी बनवलेली घरटी अनेक वेळा कोणत्या तरी घटनेची शिकार होतात.

शेताच्या बांधालगत पावसात वाढणाऱ्या रानभेंडीच्या झाडाच्या पानात, वाढलेल्या गवतावर, झाडावर आपला संसार उभा केला असून सभोवतालच्या परिसरात ते मनसोक्त बागडताना दिसून येतात. शेतात विविध धान्य तयार असल्याने लोंबीवर अनेक पक्षी भिरभिरताना दिसत आहेत.

एखाद्या झाडावर उभ्या केलेल्या घरट्यातून पिल्लांची यशस्वी वाढ सुरक्षितपणे झाली तर पक्षीही पुन्हा त्याच झाडांवर घरटी बांधत असल्याचे पाहायला मिळते. याचा प्रत्यय अनेकदा पक्षीप्रेमींना येतो.

बुलबुल, वटवट्या 

पिले आढळणारी घरटी ही बुलबुल, वटवट्या पक्ष्यांची आहेत. तसेच, कृष्ण थिरथिरा, भारीट, खंड्या, भुरळी, हळद्या, मोर, चष्मेवाला, दुर्लव असे अनेक पक्षी दृष्टीस पडतात. विविध प्रकारचे कीटक, किडे, मुंग्या पकडून आपल्या पिलांच्या चोचीत भरवताना त्यांची कसब दिसून येते.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: special photo feature on bulbul bird in ratnagiri by sachin mali

Tags
टॉपिकस
Topic Tags: