काँग्रेसची स्थिती सुधारण्याचे रत्नागिरी जिल्हाध्यक्षापुढे आव्हान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

चिपळूण - जिल्ह्यातील काँग्रेसची नाजूक स्थिती सुधारण्यासाठी जिल्हाध्यक्षांचे कसब पणाला लागणार आहे. संघटनशक्ती वाढविताना संघटनेतील जुने-नवे वाद समोर येत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात येण्यासाठी स्वबळाचा नाराही देण्यात आला. पक्षाला जनाधार मिळवण्यासाठी झगडावे लागणार आहे.

चिपळूण - जिल्ह्यातील काँग्रेसची नाजूक स्थिती सुधारण्यासाठी जिल्हाध्यक्षांचे कसब पणाला लागणार आहे. संघटनशक्ती वाढविताना संघटनेतील जुने-नवे वाद समोर येत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात येण्यासाठी स्वबळाचा नाराही देण्यात आला. पक्षाला जनाधार मिळवण्यासाठी झगडावे लागणार आहे.

काँग्रेसला संजीवनी मिळण्यासाठी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्षांनी चिपळुणात मेळावा घेत मजबूत संघटन करण्यास सुरवात केली. मेळाव्यास पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चांगला प्रतिसादही दिला. अपवाद वगळता जिल्ह्यात काँग्रेस व राष्ट्रवादीची प्रत्येक निवडणुकीत आघाडी झाली आहे.

दरम्यान, रमेश कदमांनी जिल्हाध्यक्षपदाची धुरा घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते काँग्रेसवासी झाले. पहिल्याच मेळाव्यात पदाधिकाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न झाला. चिपळूण काँग्रेसचा बालेकिल्ला करण्याचा निर्धार झाला. सद्यस्थितीला चिपळूण पालिका वगळता पंचायत समिती व जिल्हा परिषदेत काँग्रेसचे प्रतिनिधित्व नाही. पक्षाचा आमदारही नसल्याने कार्यकर्त्यांना विकासकामांना निधी मिळताना नाकी दम येतो. मेळाव्यात मित्र पक्ष राष्ट्रवादीला डिवचण्यात आले.

आमदारकीसाठी काँग्रेसची साथ हवी असल्यास, आमदारकी मिळाल्यावर राष्ट्रवादीचे नेते काँग्रेस कार्यकर्त्यांना किती निधी देणार, ते बैठक घेऊन जाहीर करण्याचे आव्हान देण्यात आले. जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्षांना तालुक्‍यातील पक्षस्थितीची चांगली जाणीव आहे. त्यामुळे जुन्यापैकी येतील ते सोबत आणि नव्या दमाच्या कार्यकर्त्यांची बांधणीही करावी लागणार आहे. 

..तसे काँग्रेसचे संघटन झाले नाही
ज्या प्रकारे राष्ट्रवादीचे संघटन वाढत गेले, तसे काँग्रेसचे संघटन झाले नाही. जनसामान्यांच्या प्रश्‍नावर फारशी आंदोलने, मोर्चेही निघाले नाहीत. केंद्रात व राज्यात सत्ता असतानाही जिल्ह्यात संघटना फारशी बळकट होऊ शकली नाही. 

प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रवादीसोबत आघाडी होत असली तरी राष्ट्रवादीकडून काँग्रेसला अपेक्षित न्याय मिळत नाही. पदे देताना काँग्रेसला बाजूला केले जाते. आमदार, खासदारकी राष्ट्रवादीकडे असतील, तर स्थानिक स्वराज्य संस्था काँग्रेसकडे असायला हव्यात.
- इब्राहिम दलवाई,
राष्ट्रीय काँग्रेस प्रांतिक सचिव

Web Title: special story Congress Chiplun conference