Special Video Story : आल्हाद काका बनले ऑलिव्ह रिडले कासवांचा आधार...

special story Turtle Breeding Center in guhagar ratnagiri
special story Turtle Breeding Center in guhagar ratnagiri

गुहागर (रत्नागिरी) : येथील समुद्रकिनाऱ्यावर सापडलेल्या 3255 अंड्यांपैकी 1908 अंड्यातून ऑलिव्ह रिडले प्रजाती पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. कासवमित्र आल्हाद तोडणकर डिसेंबर महिन्यापासून कासव संवर्धनाचे काम निष्ठेने करत आहेत. त्यामुळेच अंडी संरक्षित करण्याचे आणि अंड्यातून पिल्ले बाहेर पडण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. यावर्षी अंड्यातून पिल्ले बाहेर पडण्याचे प्रमाण जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट (५८.६२ टक्के) आहे.

गुहागर कासव संवर्धन केंद्र; सातत्याने यशस्वीतेचे प्रमाण वाढते

गेल्या 10 वर्षात गुहागर समुद्रकिनाऱ्यावर मिळणाऱ्या अंड्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. या अंड्यांचे संरक्षण, संवर्धन करण्यासाठी वन विभागाने आल्हाद तोडणकर यांची नेमणूक केली आहे. थंडीचा हंगाम सुरु झाला की आल्हाद तोडणकर ७.५० कि.मी.च्या समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारतात. कासविणीच्या पाऊलखुणा सापडल्या तर अंड्यांची जागा शोधुन तेथील अंडी संकलीत करतात. संवर्धन केंद्रात ही अंडी पुन्हा दिड फूट खड्डा खणून ठेवली जातात. याची तपशीलवार नोंद आल्हाद तोडणकर करतात.

असे होते कासव संवर्धनाचे काम

 साधारणपणे ६० दिवसांनंतर वाळुच्या खड्ड्यातून पिल्ले बाहेर पडण्यास सुरवात होते. त्यामुळे मार्च महिन्यापासून कासवमित्राला अधिक काम करावे लागते. पहाटे समुद्रकिनाऱ्यावरील फेरफटक्याबरोबरच दर तीन चार तासांनी संवर्धन केंद्रात कासवाची पिल्ले बाहेर आली आहेत का हे तपासावे लागते. एका घरट्यातील सर्व पिल्ले ६ तासांच्या कालावधीत वाळुच्या पृष्ठभागावर येतात. ही पिल्ले सुर्यादय किंवा सुर्यास्ताचे वेळी समुद्रात सोडली जातात. त्याची नोंदही तोडणकर ठेवतात.

कासवीणच्या पाऊलखूणा
या कामातील अनुभव सांगताना आल्हाद तोडणकर म्हणाले की, समुद्रातून आलेली कासवीण पाऊलखूणा मागे सोडते. तिची अपेक्षित जागा तपासते. अंडी घातलेले ठिकाण आणि तपासलेल्या अन्य जागा ओळखता येतात.  कासवीणीने दिलेल्या अंड्यांमध्ये जुळी, तीळी अंडीही असतात. अंड्याचा आकार आणि वजनावरुन मिळालेल्या अंड्यांपैकी किती अंड्यातून पिल्ले बाहेर पडतील याचाही अंदाज बांधता येतो. घरट्यातून बाहेर पडलेल्या पिल्लांमध्येही सशक्त, अशक्त पिल्ले ओळखता येतात. 


पर्यटक दूरच
हे संवर्धन केंद्र गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटन केंद्रापासून दूर असल्याने कासवाची पिल्ले पहाण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी आहे. वेळासप्रमाणे येथे पर्यटन महोत्सव होत नाही.
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com