
कोकण रेल्वेमार्गावरून धावणारी गाडी क्र. 09424 गांधीधाम येथून 07 ते 28 डिसेंबर 2020 पर्यंत दर सोमवारी 04.40 वाजता सुटणार आहे. परतीसाठी गाडी क्र. 09423 तिरुनेलवेली जंक्शन येथून दर गुरुवारी सकाळी 7.40 वाजता सुटेल.
कणकवली ( सिंधुदुर्ग ) - कोकण रेल्वे मार्गावरील गांधीधाम जं. - तिरुनेलवेली आणि जामनगर - तिरुनेलवेली साप्ताहिक विशेष एक्सप्रेसचा कालावधी वाढविण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
कोकण रेल्वेमार्गावरून धावणारी गाडी क्र. 09424 गांधीधाम येथून 07 ते 28 डिसेंबर 2020 पर्यंत दर सोमवारी 04.40 वाजता सुटणार आहे. परतीसाठी गाडी क्र. 09423 तिरुनेलवेली जंक्शन येथून दर गुरुवारी सकाळी 7.40 वाजता सुटेल. या गाडीला अहमदाबाद, वडोदरा जंक्शन, सूरत, वसई रोड, पनवेल, रत्नागिरी, मडगाव जंक्शन, कारवार, मंगरुरू जंक्शन, कोझिकोड, शोरानूर जंक्शन, थ्रीसुर, एर्नाकुलम जंक्शन, काइमकुलम जंक्शन, तिरुवनंतपुरम मध्य आणि नागरकोइल टाउन येथे थांबे आहेत.
गाडी क्र. 09578 जामनगरहून 4 डिसेंबरपासून दर शुक्रवारी आणि शनिवारी रात्री 9.20 वाजता सुटेल. गाडी क्र. 09577 तिरुनेलवेली येथून 7 डिसेंबरपासून दर सोमवारी आणि मंगळवारी सकाळी 7.40 वाजता सुटेल. ही गाडी राजकोट, सुरेंद्रनगर, अहमदाबाद जंक्शन, वडोदरा जंक्शन, अंकलेश्वर, सूरत, वापी, बोईसर, वसई रोड, पनवेल, रत्नागिरी, मडगाव जंक्शन, कारवार, उडुपी, मंगलुरू जंक्शन, कासारगोड, कन्नूर, कोझिकोड, शोरानूर जंक्शन, थ्रीसुर, अलुवा, एर्नाकुलम जंक्शन, अलाप्पुझा, कायमकुलम, कोल्लम जंक्शन., तिरुअनंतपुरम सेंट्रल, परसाला, नागरकोइल टाऊन आणि वल्लीयर स्टेशन येथे थांबेल.