दहावीची परीक्षा सुरू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

४१ हजार ४१ विद्यार्थी देणार परीक्षा

रत्नागिरी - आयुष्याच्या महत्त्वाच्या वळणावरची दहावीची परीक्षा आजपासून सुरू झाली. या परीक्षेला विद्यार्थी आनंदाने सामोरे गेले. अनेक केंद्रांवर विद्यार्थी हसतमुखाने पाहायला मिळाले. बेस्ट लक, बिनधास्त पेपर दे, अशा शुभेच्छा पालक देत होते.

४१ हजार ४१ विद्यार्थी देणार परीक्षा

रत्नागिरी - आयुष्याच्या महत्त्वाच्या वळणावरची दहावीची परीक्षा आजपासून सुरू झाली. या परीक्षेला विद्यार्थी आनंदाने सामोरे गेले. अनेक केंद्रांवर विद्यार्थी हसतमुखाने पाहायला मिळाले. बेस्ट लक, बिनधास्त पेपर दे, अशा शुभेच्छा पालक देत होते.

कोकण विभागीय शिक्षण मंडळातर्फे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात १११ परीक्षा केंद्रांवर ४१ हजार ४१ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. १२ वीच्या परीक्षेत व्हॉटस्‌ॲपद्वारे पेपरफुटीच्या अफवांमुळे दहावीच्या परीक्षेसाठी गोपनीयता बाळगली जात आहे. ७ मार्च ते १ एप्रिलदरम्यान दहावीची परीक्षा सुरू राहणार आहे.

रत्नागिरीतील ७१ परीक्षा केंद्रांवर २७ हजार ८५९ व सिंधुदुर्गातील ४० केंद्रांवर १३ हजार १८२ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. ६२३ पुनपर्रीक्षार्थी आहेत. भयमुक्त वातावरणात परीक्षेला सामोरे जाता यावे यासाठी मानसशास्त्रीय चाचणीही घेण्यात आली आहे. कोकणात दहावी परीक्षा दरवर्षी कॉपीमुक्त होते. तरीही विशेष दक्षता घेण्यात येत आहे. तसेच भरारी पथकेही नेमली आहेत.

‘जीजीपीएस’मध्ये शिस्तबद्ध परीक्षा
येथील जीजीपीएसमधील परीक्षा केंद्रावर अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने दरवर्षी परीक्षा होते. विद्यार्थ्यांना रांगेत आणि तपासणी करून सोडले जाते, विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी दप्तर, चपला ठेवण्यासाठी स्वतंत्र खोल्या दिल्या आहेत. जास्त विद्यार्थी असतील त्या दिवशी वर्गाच्या बाहेर रांगेतच चपला ठेवल्या जातात.

Web Title: ssc exam start