एस.टी. महामंडळाचे ‘एम इंडिकेटर’ ॲप

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

कणकवली - एस.टी. महामंडळाने खासगी प्रवासी वाहतुकीशी स्पर्धा करण्यासाठी डिजिटल होण्याच्या दृष्टीने पावले उचलली असून, प्रवाशांना चांगली आणि अद्ययावत सेवा देण्यासाठी स्मार्ट फोनचा उपयोग करून प्रवाशांना आकर्षित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एसटी बसची माहिती आता ‘एम इंडिकेटर’ या ॲपवर प्रवाशांना सहज मिळणार आहे. एसटी महामंडळाच्या राज्यभरात धावणाऱ्या नियमित बसेसचे वेळापत्रक प्रायोगिक तत्त्वावर एम इंडिकेटर ॲपवर उपलब्ध झाले आहे. तसेच रेल्वेच्या अपडेट वेळापत्रकाचाही समावेश करण्यात आला आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसच्या वेळापत्रकाचा समावेश प्रथमच एम इंडिकेटर ॲपमध्ये झाला आहे. विशेष म्हणजे शिवनेरी वातानुकूलित बसेसची स्वतंत्र माहितीदेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. एसटीची प्रवासी संख्या जवळपास ६० ते ७० लाख आहे. सध्याच्या घडीला राज्यभरात नियमित एकूण १८ हजार एसटी बसेस धावतात. एम इंडिकेटर ॲपच्या माध्यमातून यापुढे लाखो प्रवाशांना एसटी बसेसची अपडेट माहिती मिळू शकणार आहे. बस क्रमांकासह सर्व माहिती प्रवाशांना मिळेल. एका स्थानकातून निघालेली बस कुठपर्यंत पोहोचली, याबाबत बसच्या सद्यस्थितीची माहिती प्रवाशांना मिळणार आहे. त्यामुळे बसच्या प्रतीक्षेत बसलेल्या प्रवाशांना कोणती बस स्थानकात दाखल झाली आहे हे पाहण्यासाठी धावपळ करण्याची गरज पडणार नाही. याशिवाय शिवनेरी बसेसचे स्वतंत्र वेळापत्रक अँपमध्ये समाविष्ट आहे. शिवनेरीच्या ११७ बसेस नियमित धावत असून प्रवासी संख्या ६० हजारांच्या आसपास आहे. बस डेपोचे फोन क्रमांक अँपमध्ये नमूद असून आणखी बऱ्याच सुविधांचा लाभ एसटी प्रवाशांना घेता येणार आहे. 

भारतीय रेल्वेचे ऑफलाईन वेळापत्रक एम इंडिकेटर अँपमध्ये आधीपासूनच उपलब्ध असले तरी सुधारित अँपमध्ये पीएनआर नंबर, स्टेटस पाहणी, कोणत्या गाडीत कुठल्या प्रकारच्या डब्यात आसन उपलब्ध आहेत.

तिकीट आरक्षित करणे सोपे
आसनांचे तिकीट दर किती आहेत, यासंदर्भातील सर्व माहिती रेल्वे प्रवाशांना प्राप्त होईल. त्यामुळे १२० दिवस अगोदर प्रवाशांना आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर जाऊन तिकीट आरक्षित करणे सोपे जाणार आहे. याशिवाय प्रवासाच्या ६ तासांपूर्वी प्रवाशाला रिमाईंडर पाठवणे, तसेच गंतव्य स्थानक येण्यापूर्वी २० मिनिटे आधीच एम इंडिकेटरचे ऑटोमॅटिक अलार्म वाजेल, जेणेकरून प्रवाशांना इच्छित स्थानकावर उतरता येईल. त्याचप्रमाणो रद्द व वेळेत बदल झालेल्या रेल्वे गाड्यांची सूचना ॲपमधून प्रवाशांना मिळेल. रेल्वेचे महत्त्वपूर्ण दूरध्वनी क्रमांकही अॅपमध्ये समाविष्ट आहेत. याशिवाय वाहतुकीचे नियमभंग केल्यास भरावयाच्या दंडात्मक रकमेची माहितीसुद्धा नवीन एम इंडिकेटर ॲपमध्ये उपलब्ध आहे.

Web Title: st depo m indicator app